सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक 2022 चा थरार सुरू आहे. भारतीय संघाने अजून विश्वचषक अभियानाची सुरुवात केली नाहीये. भारताला विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत आहे. उभय संघांतील हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी एक प्रश्न अनेकांना पडला आहे. तो प्रश्न म्हणजे रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात कोणत्या यष्टीरक्षकाला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळेल. माजी दिग्गज सुनील गावसकरांनी भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयीचे गणित समजावून सांगितले आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) भारतीय संघासाठी क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये (टी-20) अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. तर दुसरीकडे दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून संघाला एका चांगल्या फिनिशरचा पर्यात उपलब्ध करून देत आहे. अनेकांच्या मते कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये पंतपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाऊ शकते. पण सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते या दोघांनाही एकाच वेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते. त्यांनी प्लेइंग इलेव्हनचे समीकरणही सांगितले.
गावसकरांच्या मते भारताने जर या सामन्यात हार्दिक पंड्याला सहाव्या गोलंदाजाच्या रूपात खेळवले तर, पंतला संधी मिळू शकत नाही. पण पंज्या जर संघासाठी पाचव्या गोलंदाजाच्या रूपात खेळला, तर मात्र पंतला संधी मिळू शकते. माध्यमांशी बोलताना गावसकर म्हणाले की, “गोष्ट एवढीच आहे की, जर संघ सहा गोलंदाजांसह खेळला, ज्यात हार्दिक पंड्या सहावा गोलंदाज असेल, तर त्याला संधी मिळू शकणार नाही. पण हार्दिक पंड्या जर पाचव्या गोलंदाजाच्या रूपात खेळला, तकर रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर आणि कार्तिक सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात.”
दरम्यान, भारतील फलंदाजी क्रमात एका डावखुऱ्या फलंदाजाच्या रूपात पंतला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु संघातील सर्व फलंदाज सध्या जबरदस्त फॉरममध्ये आहेत. विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांनी मागच्या काही मालिकांमध्ये धुवादार फलंदाजी केली होती. अशात संघ व्यवस्थापन पंतला प्लेइंग इळेव्हनमध्ये घेण्याआधी नक्कीच विचार करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटने ‘या’ पोरीला बनवले सोशल मीडिया स्टार, एकाच फोटोमुळे झाली सगळीकडे व्हायरल
जरा इकडे पाहा! प्रत्येक विमानतळावर सूर्यकुमार कसा काढतो फोटो? रोहितने नक्कलच करून दाखवली