२९ मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा १३वा हंगाम कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियामध्ये होणारे टी२० विश्वचषक रद्द झाल्यास किंवा पुढे ढकलले गेल्यास आयपीएल २०२०च्या आयोजनाचा रस्ता मोकळा होईल, असे म्हटले जात होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषक रद्द केल्यामुळे आयपीएल २०२०चे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
परंतु, भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे मोठ्या प्रणामावर दिसून येत असल्यामुळे यंदा आयपीएलचे आयोजन भारताबाहेर युएईमध्ये करण्यात येत आहे. १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरपर्यंत आयपीएल २०२० खेळले जाणार आहे. त्यामुळे सर्व आयपीएल फ्रंचायझींनी कंबर कसली आहे. खेळाडूंना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर ठेवण्यासाठी बीसीसीआयने अनेक नियम बनवले आहेत. पण, फ्रंचायझीदेखील त्यांच्या स्तरावर प्रयत्न करत आहेत.
असेही वृत्त पुढे येत आहे की, फ्रंचायझी खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्याव्यतिरिक्त रिसॉर्ट किंवा भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये करण्याचा विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या एका वृत्तानुसार, सनराइजर्स हैद्राबाद संघ सुरुवातीपासूनच गोल्फ रिसॉर्टच्या संपर्कात आहे. तर, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ अबु धाबीमध्ये त्यांचा शिबिर लावू शकतात. एवढेच नव्हे तर, मुंबई इंडियन्स एक अपार्टमेंट भाड्याने घेण्याच्या विचारात आहे. IPL Team Will Stay In Resort Instead Of Five Star Hotel
बीसीसीआयने रविवारी पार पडलेल्या बैठकीत एसओपीमध्ये सांगितले की, “जर खेळाडू हॉटेलमध्ये थांबले तर त्यांना वेगवेगळ्या ब्लॉक किंवा फ्लोअरवर इतरांपासून वेगळे रहावे लागेल. तसेच, हॉटेलमध्ये ६० दिवस सर्वांवर लक्ष ठेवणे सोपे जाणार नाही. त्यामुळे दूसऱ्या पर्यायांचा शोध चालू आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा हा खेळाडू म्हणतोय, ‘त्यावेळी मला वाटले मी माझ्या देशाचा विश्वासघात केलाय’
अपंग भारतीय क्रिकेटर्सचे होतायत हाल, सौरव गांगुलीकडून आहे मदतीची अपेक्षा
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू…
आयपीएल २०२० – या ५ युवा परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर…