---Advertisement---

पदार्पणातच द्विशतक झळकलेल्या किवी फलंदाजाला लागणार लॉटरी? ‘हे’ आयपीएल संघ खरेदीसाठी उत्सुक

On: मंगळवार, जून 29, 2021 6:50 PM
---Advertisement---

न्यूझीलंडचा डावखुरा सलामीवीर डेवॉन कॉनवेने अतिशय कमी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. त्याने आपले वनडे आणि टी२० पदार्पण मायदेशात न्यूझीलंडमध्ये केले होते. तर कसोटी क्रिकेटमधील पदार्पण त्याने इंग्लंडमध्ये केले होते. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत अल्पावधीतच आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तर त्याने पदार्पणातच द्विशतक ठोकले.

त्यामुळेच कॉनवे आता न्यूझीलंड संघाचा अविभाज्य घटक झाला आहे. इतकेच नाही तर तो आता आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात खेळतांना दिसेल, अशीही शक्यता वर्तवली जाते आहे. हा टप्पा येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र त्या दरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचे आंतरराष्ट्रीय सामने नियोजित असल्याने या दोन देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार नाहीत. मात्र न्यूझीलंडचे खेळाडू यासाठी उपलब्ध असतील. त्यामुळे आयपीएल संघाचे लक्ष आता कॉनवेकडे असेल.

१) राजस्थान रॉयल्स- राजस्थान रॉयल्सच्या संघात परदेशी खेळाडूंमध्ये इंग्लंडच्या सर्वाधिक खेळाडूंचा समावेश होता. मात्र आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात यातील बहुतेक खेळाडू भाग घेणार नाहीत. अशात राजस्थानला परदेशी खेळाडूंची गरज आहे. त्यांच्यासाठी डेवॉन कॉनवे उत्तम पर्याय ठरू शकतो.

२) सनरायझर्स हैद्राबाद- इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा सगळ्यात मोठा फटका सनरायझर्स हैद्राबादच्या संघाला बसणार आहे. कारण डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरिस्टो हे त्यांचे महत्वाचे खेळाडू आयपीएलला मुकतील. अशा परिस्थितीत त्यांना एका सक्षम सलामीवीराची नितांत गरज आहे. ही उणीव डेवॉन कॉनवे भरून काढू शकतो.

३) कोलकाता नाईट रायडर्स- कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार ईओन मॉर्गन देखील आयपीएलच्या उर्वरित हंगामाचा भाग नसेल. त्यामुळे केकेआरला परदेशी खेळाडूची आणि विशेषतः डावखुऱ्या फलंदाजाची गरज आहे. यासाठी डेवॉन कॉनवे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे केकेआरदेखील त्याला संघात घेण्यासाठी उत्सुक असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट, पुजाराच्या विकेटनंतरही भारतीय संघाला होती WTC फायनलमध्ये पुनरागमनाची संधी, विलियम्सनचे मोठे भाष्य

इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘त्या’ व्यक्तीचे नाव टाकल्याने पुन्हा रंगल्या राहुल- अथियामधील अफेअरच्या चर्चा

क्षणभर विश्रांती! इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू करतायेत इंग्लंडमध्ये ‘चिल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---