इंडियन प्रीमियर लीग चौथ्या पर्वात आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या पॉल वॉल्थाटी याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या पत्रात त्याने आपण प्रथमश्रेणी क्रिकेट मधून थांबण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले. 2011 आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शतक झळकावल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सुरुवात केलेल्या पॉलने आयपीएल मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना मोठी प्रसिद्धी मिळवली होती. मध्यम गती गोलंदाजी तसेच आक्रमक फलंदाजी असे वैशिष्ट्य असताना त्याने 2011 हंगाम गाजवलेला. त्यानंतर मात्र त्याला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही व तो अल्पावधीतच संघातून बाहेर गेला. यादरम्यान त्याने मुंबईसाठी खेळणे सोडून हिमाचल प्रदेशसाठी काही प्रथम श्रेणी सामने खेळले. परंतु, मागील काही वर्षांपासून त्याला दृष्टीदोषाचा त्रास होऊ लागलेला.
पॉल 2002 मध्ये अंडर नाईन्टीन भारतीय संघाचा सदस्य होता. त्या विश्एवचषकात एक चेंडू त्याच्या डोळ्याजवळ लागल्याने त्याला दिसण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. त्यामुळे तो मागील बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मुख्य प्रवाहापासून दूर होता.
त्याच्या कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 5 सामने खेळताना 120 धावा व एक बळी मिळवलेला. तसेच चार अ दर्जाचे सामने देखील तो खेळला. पंजाब व राजस्थान रॉयल्स या संघासाठी आयपीएल खेळताना त्याने 774 धावा केल्या. आपल्या निवृत्तीच्या निवेदनात त्याने आपल्याला संधी देणाऱ्या सर्व संघांचे आभार व्यक्त केले.
(IPL Wonder Boy Paul Valthaty Announced First Class Retirement)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान वनडे संघाला मोठी विश्रांती, 2023 विश्वचषकानंतर खेळाडू एक वर्षांच्या सुट्टीवर
वेस्ट इंडीजसाठी युवा स्पिनर करणार कसोटी पदार्पण! दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा