आयपीएल 2024 संपले. रविवारी, 26 मे रोजी चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना झाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाने सांघिक कामगिरी करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. आता आयपीएल संपल्यानंतर 2 जून पासून आगामी टी-20 विश्वचषकाचा रणशिंग फुंकला जाणार आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील जवळपास सर्व खेळाडू अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत. बीसीसीआयनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी अमेरिकेला पोहोचणाऱ्या खेळाडूंची क्लिप शेअर केली होती. अमेरिकेला पोहोचण्यासाठी आता फक्त काही खेळाडू राहीले आहेत.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धर्तीवर यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेच्या ‘अ’ गटात आहे, ज्यामध्ये भारतीय संघाव्यतिरिक्त अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंडचाही समावेश आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजमधील सर्व सामने अमेरिकेत खेळणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 30 एप्रिल रोजी टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील 15 सदस्यीय खेळाडूंची घोषणा करणयात आली होती. रोहित शर्माला संघाचा कर्णधार आणि हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. 15 सदस्यीय संघासोबतच 4 राखीव खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली होती.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार ), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा,अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
राखिव खेळाडू- शुबमन गिल, रिंकु सिंह, खलिल अहमद, आवेश खान
टीम इंडियाचे टी 20 विश्वचषकातील वेळापत्रक
पहिला सामना 05 जून, बुधवार – भारत विरुद्ध आयर्लंड – नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
दुसरा सामना 09 जून, रविवार – भारत विरुद्ध पाकिस्तान – नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
तिसरा सामना 12 जून, बुधवार – भारत विरुद्ध यूएसए – नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
चौथा सामना 15 जून, शनिवार – भारत विरुद्ध कॅनडा – सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय सचिव जय शाहांची मोठी घोषणा! ग्राउंड्समन आणि पिच क्युरेटर्सना मिळणार 25 लाख रुपये
“केकेआर जिंकली तर ‘ब्रा’ न घातलेला फोटो पोस्ट करेन”, मॉडेलनं पाळला शब्द