आयर्लंड आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना रविवारी (२६ जून) खेळला गेला. भारताने या सामन्यात ७ विकेट्स आणि १६ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. युझवेंद्र चहल आणि दीपक हुड्डाने संघासाठी सर्वात महत्वाचे योगदान दिले आणि विजय देखील मिळवला. सामना संपल्यानंतर या दोघांमध्ये चर्चा झाली. चर्चेदरम्यान, हुड्डाला चांगली फलंदाजी करण्यासाठी मी मार्गदर्शन केले, असे चहल म्हटला.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या सामन्यात सामनावीर ठरला. त्याने टाकलेल्या ३ षटकांमध्ये ११ धावा खर्च केल्या आणि १ विकेटही घेतली. तर २७ वर्षीय दीपक हुड्डा (Deepak Hooda) पहिल्यांदाच सलामीवीराच्या भूमिकेत दिसला. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे खेळू शकला नाही, अशात हुड्डावर सलामीची जबाबदारी येऊन पडली. हुड्डा या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने २९ चेंडूत नाबाद ४७ धावा फटकावल्या.
सामना संपल्यानंतर चहल आणि हुड्डा यांनी बीसीसीआयसाठी एकत्र चर्चा केली. चर्चेदरम्यान चहल गमतीशीर अंदाजात म्हणाला की, “हुड्डा ज्याने पहिल्या डावात सलामी केली, त्याला मी आधीच सांगितले होते की, त्याला कशा पद्धतीने फलंदाजी करायची आहे?” त्यानंतर हुड्डा म्हणाला की, “फलंदाजी करताना थोडा चिंतेत होतो, पण आयुष्यात थोडी आव्हाने असायलाच हवीत.”
हुड्डा आयपीएलचा उल्लेख करत म्हटला की, “त्याला तिथे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागत होती, त्यामुळे तो अशा परिस्थितीसाठी आधीच तयार होता.” पुढे हुड्डाने चहलला प्रश्न विचारला की, तुला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे, तर कसे वाटत आहे? यावर चहल म्हणाला की, “हा चांगला अनुभव होता. थंडीमुळे बोटं काम करत नव्हते. अशात माझा प्लान होता की, लेंथ थोडी लांब ठेवेल आणि मध्ये मध्ये गोलंदाजीत बदलही करेल.”
On a chilly Dublin evening ❄️❄️Chahal TV 📺returns with a special featuring @HoodaOnFire who opened the innings for #TeamIndia – by @RajalArora
P.S. Bring on some more sweaters for @yuzi_chahal 😁
Click here for full video 👉👉 https://t.co/PaPtNKJyT3 pic.twitter.com/KnYFk6cF4o
— BCCI (@BCCI) June 27, 2022
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या नुकसानावर १०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य ९.२ षटकात आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. आता मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (२८ जून) रात्री खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
काहीतरी शिजतंय? इंग्लंडच्या महिला क्रिकेटरसोबत लंडनमध्ये फिरतोय अर्जुन, डिनर डेटचे फोटो चर्चेत
२००७नंतर भारताचे जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार, बेन स्टोक्सने केला विश्वास व्यक्त