टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील तिसरा सामना अ गटातील आयर्लंड आणि श्रीलंका (SLvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. श्रीलंकेने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत आयर्लंडला केवळ 128 धावांवर रोखले. मात्र, त्याचवेळी आयर्लंड संघाचा अष्टपैलू जॉर्ज डॉकरेल (George Dockrell) हा कोविड बाधित असताना देखील या सामन्यात खेळताना दिसून आला. अशाप्रकारे कोविडबाधित असतानाही मैदानात उतरणारा पहिला खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली. (George Dockrell COVID)
COVID UPDATE
Cricket Ireland today confirmed that George Dockrell has been identified as a potential positive for COVID and is being managed in line with current local, national and ICC guidelines for the management of COVID-19.
Read more: https://t.co/V9ZbTAc1hu#BackingGreen
— Cricket Ireland (@cricketireland) October 23, 2022
पात्रता फेरीतून पुढे आलेल्या आयर्लंड व श्रीलंका यांच्यातील सामन्याआधी नियमाप्रमाणे सर्व खेळाडूंची कोविड चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये आयर्लंडचा डॉकरेल याची कोविड चाचणी सकारात्मक आली. त्याला काही प्रमाणात कोविडची सौम्य लक्षणे असल्याचे सांगण्यात आले. क्रिकेट आयर्लंडने ट्विट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले,
“जॉर्ज डॉकरेलची लक्षणे अत्यंत सौम्य आहेत. आमची मेडिकल टीम त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवतेय. ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्देशानुसार योग्य ती खबरदारी घेतली जाईल. खबरदारी म्हणून तो संघापासून वेगळा प्रवास करतोय.”
असे असले तरी डॉकरेल आयसीसीच्या नियमानुसार श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसला. आयसीसीने विश्वचषकाआधी सौम्य लक्षणे असलेल्या खेळाडूंना विश्वचषकात खेळण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे कोविड बाधित असतानाही सामना खेळणारा डॉकरेल पहिला पुरुष क्रिकेटर ठरला. यापूर्वी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची ताहिला मॅकग्रा कोविडबाधित असताना मैदानावर उतरली होती.
पहिल्या फेरीच्या स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात संघासाठी निर्णायक खेळी करणारा डॉकरेल सुपर 12 फेरीच्या पहिल्या सामन्यात मात्र अपयशी ठरला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत तो 16 चेंडूंवर केवळ 14 धावा करू शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच
‘त्यांनी चांगली गोलंदाजी केली’, अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांच्या बॉलर्सचे बटलरकडून कौतुक