---Advertisement---

उद्याचा दिवस क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णांक्षरांनी लिहीला जाणार!

On: गुरूवार, मे 10, 2018 1:59 PM
---Advertisement---

उद्यापासून पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. हा कसोटी सामना आयर्लंडचा इतिहासातील पहिलाच कसोटी सामना आहे.

पाकिस्तानचा हा ४१३ वा सामना असुन यापुर्वी त्यांनी ४१२ सामन्यात १३२ विजय तर १२२ सामन्यात पराभव पाहिले आहेत.

२३ जून २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोशिएशनने आयर्लंड, अफगाणिस्तान संघांना पूर्णवेळ सदस्यत्वाचा तसेच कसोटी क्रिकेटचा खेळणाऱ्या संघांचा दर्जा दिला होता.

त्यानंतर यातील आयर्लंड संघ उद्या आपला पहिला सामना खेळणार आहे तर अफगाणिस्तान १४ जूनपासुन आपला पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध बेंगलोर येथे खेळणार आहे.

आयर्लंडचा संघ कर्णधार विल्यम पोर्टरफिल्डच्या नेतृत्वाखाली ११ ते १५ मे दरम्यान पाकिस्तानशी आपला पहिला कसोटी सामना मायदेशात खेळणार आहे. डब्लिनला हा सामना होणार आहे.

सध्या आयसीसीच्या कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या १० वरून १२ झाली आहे.

या दोन देशांना आयसीसीकडून एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट प्रकारात याआधीच मान्यता मिळाली होती. यांनी पूर्णवेळ सदस्य असलेल्या संघांविरुद्ध कायमच चांगला खेळ केला आहे.

सध्या जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असणाऱ्या आयर्लंड संघाने २०११ ला विश्वचषकात इंग्लंडला तर २०१५ विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केले होते.

हा कसोटी सामना झाल्यावर आयर्लंड संघाचे नाव प्रथमच कसोटी क्रमवारीत दिसणार आहे.

दिवसातील महत्त्वाच्या बातम्या- 

वनडेतील सर्वात अनुभवी खेळाडू करणार २०१९ला क्रिकेटला टाटा-बायबाय

रोहितचा असाही एक विक्रम जो काल फारसा कुणाच्या ध्यानात आला नाही

सगळे प्रयत्न करुन झाले पण केकेआरवर राज्य तर रोहित शर्माची मुंबईच करते!

रोहित शर्मा आणि इडन गार्डनचे नाते काही खास!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment