---Advertisement---

आयर्लंडच्या सलामीवीराचे टी२०त नाबाद शतक, चक्क १६४ धावांनी जर्मनीला चारली धूळ

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 12:01 AM
---Advertisement---

सध्या जगभरात क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात क्रिकेटला आणखी चालना मिळावी यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) याबाबत अनेक प्रयत्न करत आहे. जगभरातील बरेचसे देश आता क्रिकेटकडे देखील वळले आहेत. तसेच यांच्यात सामने देखील खेळविण्यात येत आहेत.

अशातच आयसीसीद्वारा अनेक क्षेत्रीय भागात महिलांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी अनेक टी-२० सामने खेळवले जात आहेत. यातीलच युरोपच्या क्षेत्रीय भागात सध्या पात्रता फेरीचे सामने पार पडत आहेत. ज्यातील एका सामन्यात आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाने जर्मनीच्या महिला क्रिकेट संघाचा तब्बल १६४ धावांनी धुव्वा उडवला.

आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाने २० षटकांमध्ये १९६ धावा ठोकत जर्मनी संघासमोर १९७ धावांचे विशाल आव्हान ठेवले होते. मात्र, याच्या उत्तरादाखल उतरलेल्या जर्मनीच्या संघाने २० षटकांमध्ये केवळ ३२ धावा केल्या. विशेष म्हणजे जर्मनीच्या महिला क्रिकेट संघाने केवळ ३ च विकेट गमावल्या होत्या.

मात्र तरीही जर्मनी संघाने २० षटकात केवळ ३२ धावा केल्या, ज्यामध्ये जर्मनीची कर्णधार अनुराधाने २९ चेंडूमध्ये केवळ ५ धावा केल्या. तर सलामीचे फलंदाज एना हीलीने २० चेंडूत ३ धावा केल्या. क्रिस्टीना गॉफने तब्बल ५८ चेंडूंमध्ये केवळ १४ धावा केल्या. जर्मनीच्या पूर्ण डावात त्यांना केवळ एकच चौकार मारता आला.

तत्पूर्वी, आयर्लंडकडून खेळताना गॅबी लुईसने दमदार शतक ठोकले. ज्यामध्ये तिने ६० चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १०५ धावा केल्या. यासह लुईस टी-२० मध्ये शतक ठोकणारी पहिली आयरिश महिला क्रिकेटर बनली. याशिवाय लुईस सोबत सलामीला आलेली रेबेका स्टोकेलने ३० चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. आयर्लंडच्या या दमदार विजयानंतर आयर्लंडचा संघ पुढच्या सामन्यात स्कॉटलंडसोबत भिडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
हे पराक्रम पाहा आणि तुम्हीच ठरवा ‘रनमशीन’ कोण ते? विराट कोहली की जो रूट?
रूट नॉन-स्टॉप! आक्रमक शतकासह घातली आणखी दोन विक्रमांना गवसणी
तेच मैदान, तेच विरोधक! तब्बल ६२ वर्षांनंतर इंग्लंडच्या सलामी जोडीची भारताविरुद्ध ‘नाद खुळा कामगिरी’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---