टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाण आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने मागीलवर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो आता समालोचन करताना दिसतो. नुकताच त्याने गोलंदाजांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. यावेळी त्याने भुवनेश्वर कुमार आणि शोएब अख्तर यांचे उदाहरण दिले आहे.
त्याने सांगितले की वेगवान गोलंदाजांनी आपला वेग वाढवण्याच्या नादात आपल्या स्विंगचा त्याग करू नये, कारण तुम्ही भुवनेश्वर कुमारवरून शोएब अख्तर होऊ शकत नाही.
पठाणने भुवनेश्वर कुमारचे उदाहरण देत सांगितले की एक स्विंग गोलंदाज जगात कुठेही आपली छाप सोडू शकतो आणि वेगवान गोलंदाजी म्हणजे फक्त वेगाने चेंडू टाकणे, असा होत नाही. द प्लेफिल्ड मॅगझीनला लिहिलेल्या स्तंभात इरफान पठाणने सांगितले की, 130-135 वेगाने गोलंदाजी करताना सुद्धा चेंडू स्विंग होतो हे सिद्ध झाले आहे.
भुवनेश्वरवरून अख्तर बनू शकत नाही
इरफान पठाणने सांगितले की, स्विंग गोलंदाज विविधतेचा उपयोग आपल्या गोलंदाजीत करत असतो, तसेच यॉर्करचा उपयोग देखील तो करू शकतो, त्यामुळे फक्त गतीचा विचार नाही केला पाहिजे. त्याने सांगितलं की, ‘आपण वेगवान गोलंदाजी करू शकत नाही ही बाब तुम्हाला नेहमी निराश करेल. तुम्ही भुवनेश्वरवरून अख्तर बनू शकत नाही. ही गोष्ट अशक्य आहे. त्यानादात तुम्ही स्विंग हरवून द्याल आणि मग फलंदाजाला तुम्ही आपल्या ताब्यात ठेवू शकणार नाही.’
‘स्विंग’ हरवू देऊ नका
त्याने सांगितले की, ‘गोलंदाजांना माझा एक सल्ला आहे की फक्त वेग वाढवण्याच्या नादात तुम्ही तुमच्या स्विंगला विसरू देऊ नका’. स्विंग गोलंदाजीसाठी आवश्यक गतीचा तुम्ही वापर करा. एक स्विंग गोलंदाज सामान्यपणे 130-135 किलोमीटर प्रति तास वेगाने गोलंदाजी करत असतो, जी वैज्ञानिकदृष्ट्या स्विंग प्राप्त करण्यासाठी सगळ्यात चांगली गती आहे. पंरतु जर तोच गोलंदाज यॉर्कर अथवा कमी गतीने किंवा कटर त्याच गतीने करू शकला, तर तो जगभरात आपला दबदबा निर्माण करू शकतो.’
रिव्हर्स स्विंग ही एक कला आहे:
इरफानने सांगितले की, ‘जर गोलंदाजांची शरीररचना चांगली असेल, तर तो आपल्या इच्छेनुसार यॉर्कर गोलंदाजी करू शकतो. तसेच दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करू शकतो. हे सत्य आहे की तुम्हाला जुन्या चेंडूवर त्याप्रमाणात स्विंग मिळत नाही, ज्याप्रमाणात नव्या चेंडूवर मिळतो कारण रिव्हर्स स्विंग एक वेगळी कला आहे.’
भुवनेश्वर कुमार एक वर्षापेक्षा अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता, पंरतु यावर्षी मायदेशात इंग्लंडविरुद्ध मालिकेत त्याने शानदार पुनरागमन केले. भुवनेश्वर जो आपल्या स्विंगसाठी ओळखला जातो, त्याने इंग्लंडविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यात 6 बळी आणि 5 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 4 बळी घेतले. तसेच इंग्लंडच्या मजबूत फलंदाजीविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत 6.38 च्या सरासरीने गोलंदाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
ताबडतोड फलंदाजी! आपल्या अद्भुत फटकेबाजीने लोकांचे मनोरंजन करणारे ३ फलंदाज
फ्रेंच ओपनच्या उपांत्यफेरीत रंगणार ‘हाय-व्होल्टेज’ सामना; नदाल-जोकोविच येणार आमने-सामने
“तेव्हा मी अहंकार बाजूला ठेवला होता” विराट कोहलीची प्रांजळ कबुली