---Advertisement---

हार्दिक पांड्यामुळे इरफान पठानने BCCIला दिला मोठा सल्ला; म्हणाला, ‘हार्दिकसारखे क्रिकेटपटू…

On: गुरूवार, फेब्रुवारी 29, 2024 2:31 PM
Irfan Pathan
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली. ज्यामध्ये एकूण सात खेळाडूंना केंद्रीय करारातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर या यादीत श्रेयस अय्यर, इशान किशनपासून ते युझवेंद्र चहल आणि चेतेश्वर पुजारापर्यंतच्या नावांचा समावेश आहे.अय्यर-इशानने रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या दोघांना बीसीसीआयने चांगला धडा शिकवला आहे.

याबरोबरच ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोन खेळाडूंना 28 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयने मोठा धक्का दिला होता. यानंतर अनेक दिग्गज दोन्ही खेळाडूंना पाठिंबा देताना पहायला मिळाले आहेत. तसेच इशान किशनने नोव्हेंबरमध्ये शेवटचा सामना खेळला होता. तर श्रेयस अय्यर अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांचा भाग होता. केंद्रीय करारातून बाहेर पडल्यानंतर माजी क्रिकेटपटू इरफान पठाणही या दोन खेळाडूंच्या समर्थनार्थ सध्या पुढे आला आहे.

तसेच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीही इशान किशन आणि श्रेयस अय्यरच्या समर्थनार्थ बोलताना दिसले आहेत. इरफान पठाणने सोशल मीडियावर करत म्हणाला आहे की, ‘श्रेयस आणि इशान दोघेही प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. आशा आहे की जोरदार पुनरागमन करतील. जर हार्दिक पांड्या सारख्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याने आणि त्याच्यासारख्या इतरांनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना पांढऱ्या चेंडूच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावा का? जर हे सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेट अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही.

https://twitter.com/IrfanPathan/status/1763076426163744826

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही स्थानिक स्पर्धांना प्राधान्य न देणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात येईल, असा इशारा दिला होता. कर्णधार रोहित शर्मा याच्याकडूनही देशासाठी खेळण्याची भूक असलेल्यांनाच भारतीय संघात संधी देण्यात येईल, असे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यानंतर स्पष्ट करण्यात आले होते.

BCCI कडून वार्षिक करार जाहीर, मिळाली या खेळाडूंना संधी नावे पुढीलप्रमाणे – 

A+ श्रेणी – रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

A श्रेणी – आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.

ब श्रेणी – सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.

क श्रेणी – रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---