---Advertisement---

इरफानने पहिल्या षटकात लुटल्या खूप धावा, मग सचिनच्या ‘त्या’ शब्दांनी मिळाली प्रेरणा अन्…

---Advertisement---

बुधवारी (१७ मार्च) शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये, भारतीय लीजेंड्स आणि वेस्ट इंडिज लीजेंड्स संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय लीजेंड्स संघाने बाजी मारत दिमाखात रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात भारतीय लीजेंड्स संघाने वेस्ट इंडिज लीजेंड्स संघावर १२ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात शेवटचे षटक फेकणाऱ्या इरफान पठाणने सचिन तेंडुलकर बद्दल केलेले एक ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय लीजेंड्स संघाने अवघ्या ३ गडींच्या मोबदल्यात २० षटकाखेर २१८ धावा केल्या होत्या. २१९ धावांचा पाठलाग करताना कर्णधार सचिनने सामन्याची सुरुवात करण्याची जबाबदारी इरफान पठाणला दिली होती. त्याने आपल्या पहिल्याच षटकात ५ वाइड चेंडू फेकत १८ धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात त्याने अनुक्रमे ११, १५ धावा खर्च केल्या होत्या.

३ षटकात ४४ धावा खर्च केल्या असतानाही निर्णायक षटकात १७ धावांची गरज असताना सचिनने इरफानला गोलंदाजीसाठी बोलवले आणि त्याने संघाला सामना देखील जिंकवून दिला. त्यानंतर सचिनने घेतलेला निर्णय फसतो की काय असे वाटू लागले असताना इरफानने अवघ्या ४ धावा देत भारतीय लीजेंड्स संघाला सामना १२ धावांनी जिंकवून दिला.

या सामन्यानंतर इरफान पठाणने एक ट्विट केले आहे ज्यामध्ये त्याने लिहिले की, “फक्त एका षटकामुळे माझा तुझ्यावरचा विश्वास कमी नाही होणार. तू हा सामना नक्कीच जिंकवशील. माझ्या आयुष्यातील सर्वात खराब षटक टाकल्यानंतर सचिन पाजीनी हे शब्द माझ्याबद्दल म्हटले होते.”

https://twitter.com/IrfanPathan/status/1372242597268234241?s=20

https://twitter.com/munafpa99881129/status/1372262679168057348?s=20

https://twitter.com/ImAravnd/status/1372244599150813185?s=20

https://twitter.com/rajdeep189/status/1372242805502799873?s=20

https://twitter.com/dilsey_masood/status/1372271077615878145?s=20

भारतीय लीजेंड्स संघाने उभा केला २१८ धावांचा डोंगर

भारतीय लीजेंड्स संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने संघाला चांगली सुरुवात करून दिली. सेहवागने १५ चेंडूत ३५ धावांची आक्रमक खेळी केली. तसेच कर्णधार तेंडुलकरने ४२ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. २००७ विश्वचषक स्पर्धेत एकाच षटकात ६ षटकार लगावणाऱ्या युवराजने या सामन्यातदेखील एकाच षटकात ६ षटकार लगावले. युवराजने अवघ्या २० चेंडूत ४९ धावा केल्या. तसेच युसुफ ने ३७ आणि मोहम्मद कैफने २७ धावांचे योगदान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज लीजेंड्सचा डाव ६ बाद २०१६ धावांवर आटोपला. परिणामत इंडिया लीजेंड्सने अंतिम सामन्यात प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बुमराह फॅमिली’ची सून नांदणार ‘या’ आलिशान बंगल्यात; पाहून म्हणाल, वाह क्या बात!

टी२० विश्वचषकासाठी भारताची जय्यत तयारी, इंग्लंडनंतर ‘या’ संघांविरुद्ध खेळणार टी२० मालिका 

युवा गोलंदाजाने धोनीला केलं बोल्ड, दूर उडून पडली दांडी; व्हिडिओ होतोय व्हायरल  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---