सध्याचे वर्ष दिनेश कार्तिकसाठी आतापर्यंत खूप चांगले ठरले आहे. आयपीएल २०२२ मध्ये शानदार फलंदाजी केल्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिका मालिकेतही आपला ठसा उमटवला. अनेक माजी क्रिकेटपटूंना त्याच्या फलंदाजीच्या शैलीतील जबरदस्त बदलाची खात्री पटली आहे. या यादीत इरफान पठाणचाही समावेश आहे. इरफानने दिनेश कार्तिकच्या स्फोटक फलंदाजीची तुलना एबी डिव्हिलियर्सशी केली आहे.
इरफान म्हणाला की, “इतकी रेंज असलेला खेळाडू तुम्हाला सापडणार नाही. गुणवत्तेनुसार मी त्याची (दिनेश कार्तिक) तुलना एबी डिव्हिलियर्सशी करणार नाही, परंतु त्याची श्रेणी डिव्हिलियर्सशी मिळतीजुळती आहे. तो स्विचवर मारू शकतो, त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. तो लेग साइडमध्ये जोरदार फटके मारतो. विशेष म्हणजे तो ज्या पद्धतीने बॉलच्या ओळीत येण्यासाठी त्याच्या पावलांचा वापर करतो, तो खूप चांगला आहे.” भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा सामना पावसाने वाहून गेल्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफानने या गोष्टी सांगितल्या.
इरफान म्हणाला की, “तो वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोन्ही प्रभावीपणे खेळतो. जर तुम्ही त्याला पहिल्या बॉलने फटके मारण्यास सांगितले तर तो तेही करू शकतो. फिनिशरसाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि दिनेश कार्तिक ते करू शकतो.”
आयपीएल २०२२ मध्ये दिनेश कार्तिक गर्जला
दिनेश कार्तिकने आयपीएलच्या या हंगामात १८३.३३ च्या स्ट्राइक रेटने ३३० धावा केल्या. या दमदार कामगिरीनंतर त्याला तब्बल ३ वर्षांनी टीम इंडियात स्थान मिळवता आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो भारतीय संघाचा भाग बनला. येथेही त्याने आपली लय कायम राखत जबरदस्त खेळ दाखवला. चौथ्या टी२० मध्ये त्याने २७ चेंडूत ५५ धावा करून भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. दिनेश कार्तिकच्या बळावर भारताने हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यात यश मिळवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ENG vs IND | राहुल द्रविडच्या उपस्थितीत टीम इंडिया १५ वर्षांनी रचणार इतिहास, वाचा काय करणार दिग्गज
BIG BREAKING । भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला कोरोनाची लागण, कसोटी खेळण्यावर प्रश्नचिन्ह
रोहित-विराटला ‘ही’ चूक चांगलीच भोवली, बीसीसीआयने फटकारल्याने दोघांच्या अडचणीत वाढ