---Advertisement---

खरंच गंभीरच्या कुत्र्याचं नाव ‘ओरिओ’ आहे? धोनी लाईव्ह आल्यानंतर गंभीरनेही शेअर केलाय व्हिडिओ

On: बुधवार, सप्टेंबर 28, 2022 10:09 AM
MS-Dhoni-Gautam-Gambhir
---Advertisement---

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनी नुकताच सोशल मीडियावर लाईव्ह आला होता. धोनी लाईव्ह येऊन काहीतरी मोठी घोषणा करणार, असा चाहत्यांचा अंदाज होता, पण तसे काहीच झाले नाही. धोनी बिस्किट कंपणी ‘ओरिओ’ यांची जाहिरात करण्यासाठी लाईव्ह आला होता. धोनीच्या या लाईव्हनंतर भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत गंभीरच्या कुत्र्याचे नाव ओरिओ असल्याचे समजते. चाहते हा व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. 

एमएस धोनी (MS Dhoni) लाईव्ह येणार म्हणून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्याने यावेळी ‘ओरिओ’ बिस्किटाची (Oreo biscuits) जाहिरात करताना 2011 विश्वचषकाशी संदर्भ जोडला. धोनी म्हणाला की, 2011 मध्ये ही कंपनी सुरू झाली होती आणि याच वर्षी भारताने विश्वचषक जिंकला होता. आता 2022 मध्येही विश्वचषक खेळला जाणार आहे आणि यावर्षी कंपनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे. धोनीच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, कंपनी भारतीय संघासाठी लकी आहे, असेच त्याला म्हणायचे होते.

धोनीच्या लाईव्हनंतर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहून काही चाहते असा दावा करत आहेत की, गंभीरने हा व्हिडिओ धोनीला विरोध करण्यासाठीच पोट्स आहे. तर काहीच्या मते धोनी आणि गंभीरच्या व्हिडिओचा एकमेकांशी कसलाही संबंध नाहीये. व्हिडिओत गंभीर स्वतः ओरिओविषयी काहीच बोलत नाहीये. पण त्याची मुलगी त्यांच्या कुत्र्याला ओरिओ नावाने बोलवते. त्याची मुलगी एका खुर्चीवर उभा आहे आणि कुत्र्याला बोलावत आहे. व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.

https://www.instagram.com/reel/Ci-I5rFoQNu/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2011 विश्वचषक जिंकला होता. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात धोनीने 97 तर गंभीरने 91 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती आणि संघाला विश्वचषक जिंकवून दिला होता. भारतीय संघाच्या एतिहासातील हा दुसरा विश्वचषक तब्बल 28 वर्षांनंतर जिंकला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

मालिकेआधीच दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने म्यान केली तलवार! पत्रकार परिषदेत म्हणाला…
राष्ट्र सर्वप्रथम! भारत-पाक मालिकेला बीसीसीआयचा स्पष्ट शब्दात नकार
बलात्कारप्रकरणी दिग्गज क्रिकेटपटू विरोधात अटक वॉरंट! क्रिकेट कारकीर्द धोक्यात  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---