---Advertisement---

पृथ्वी शाॅ दुखापतग्रस्त नसून या कारणामुळे संघाबाहेर?

On: गुरूवार, जुलै 4, 2019 6:41 PM
---Advertisement---

येत्या 11 जूलैपासून भारत अ संघाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 वनडे सामन्यांच्या मालिकेपासून होणार आहे. पण हा दौरा सुरु होण्याआधीच भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार शॉ दुखापतग्रस्त आहे. पण त्याला कोणती दुखापत आहे, याबद्दल बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे शॉला खरंच दुखापत आहे की तो अनफीट आहे याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार याबद्दल माहिती असणाऱ्या काही जणांनी माहिती दिली आहे की फिटनेसच्या कमतरतेमुळे शॉला संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

नेहमी खेळाडूंच्या दुखापतीबद्दल पूर्ण माहिती देणाऱ्या बीसीसीआयने शॉबद्दल मात्र कोणतेही भाष्य केलेले नाही. बीसीसीआयने 2019 विश्वचषकात नुकतेच दुखापतग्रस्त झालेल्या शिखर धवन आणि विजय शंकरच्या दुखापतीबद्दलही पूर्ण माहिती दिली होती. पण शॉबाबत अशी काहीही बीसीसीआयने माहिती दिलेली नाही.

शॉ सध्या बंगळूरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलीटेशन करत आहे.

तसेच एका सुत्राने सांगितले की लाइफस्टाईलशी जोडलेल्या काही गोष्टी शॉच्या शरिरावर परिणाम करत आहेत. 19 वर्षाचा हा खेळाडू आता 20 व्यावर्षात पदार्पण करणार आहे. त्याच्याबद्दल आणि तो कसा पुढे जाणार आहे यावर बीसीसीआयने गंभीर होण्याची गरज आहे.

आम्हाला आणखी एका प्रतिभाशाली खेळाडूला विनोद कांबळीच्या मार्गावर जाताना पाहण्याची इच्छा नाही.

शॉच्या ऐवजी बीसीसीआयने वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यासाठी भारत अ संघात महाराष्ट्राचा 22 वर्षीय सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडला संधी दिली आहे.

याबरोबरच या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी आधी मयंक अगरवाल आणि रिषभ पंत यांच्या नावाचाही भारत अ संघात समावेश होता. परंतू या दोघांचाही विश्वचषकासाठी वरिष्ठ भारतीय संघात समावेश करण्यात आल्याने त्यांच्या ऐवजी भारत अ संघात अनमोलप्रीत सिंग आणि इशान किशन यांना संधी मिळाली आहे.

विंडीज अ विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 15 असा आहे भारत अ संघ – 

मनीष पांडे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अनमोलप्रीत सिंह, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कृणाल पंड्या, दीपक चहर, खलील अहमद, अवेश खान, नवदीप सैनी

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून धोनी प्रत्येक सामन्यात बदलतोय बॅट

काल निवृत्ती घेतलेल्या अंबाती रायडूला विराट कोहलीने अशा दिल्या शुभेच्छा

मयंक अगरवालला टीम इंडियात संधी देण्याचा विराट-शास्त्रींनी घेतला निर्णय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment