भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या आयुष्यात गेल्या ५ महिन्यांपासून बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहे. नुकतीच भारतीय संघाने त्याच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ च्या फरकाने गमावली. त्यानंतर शनिवारी (१५ जानेवारी) अचानक त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार (Virat Kohli Step Down As Test Captaincy) होणार असल्याचा धक्कादायक निर्णय घेतला. यापूर्वीच विराटने टी२० विश्वचषकानंतर स्वत:हून टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडले होते. तर त्यानंतर त्याच्याकडून वनडे संघाची कमानही काढून घेण्यात आली होती.
विराटच्या कारकिर्दीतील या अकनाक बदलांची सुरुवात त्याने काही महिन्यांपूर्वी केलेल्या ट्वीट (Virat Kohli’s Tweet) पासून झाली. त्याबद्दल सविस्तर येथे जाणून घेऊ …
व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’ । Virat Kohli Press Conference
आता माजी कर्णधारांच्या यादीत घेतले जाणार कोहलीचे नाव
विराट टी२०, वनडेनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदावरूनही जाणार हे त्याने १६ सप्टेंबर २०२१ रोजी केलेल्या ट्वीटवरून निश्चित झाले होते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. १६ सप्टेंबरला विराटने टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याच्या निर्णयाची घोषणा केली होती.
यावेळी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले होते की, ‘भारताचे प्रतिनिधित्वच नाही, तर भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करायला मिळाल्याबद्दल मला भाग्यवान समजतो. मी त्या सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी मला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून माझ्या प्रवासात पाठिंबा दिला. संघसहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समीती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येत भारतीय, ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली, त्या सर्वांशिवाय मी काही करु शकलो नसतो.’
त्याचबरोबर ३३ वर्षीय विराट पुढे म्हणाला होता, ‘तुमच्यावरील कामाचा ताण लक्षात घेणं महत्त्वाचं असतं आणि मी गेले ८-९ वर्षे तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळत आहे आणि गेले ५-६ वर्षे नेतृत्व करत आहे. त्यामुळे मला वाटते की मी स्वत:ला भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्ण सज्ज होण्यास वेळ द्यायला हवा.’
‘मी माझ्या टी२० कर्णधारपदाच्या काळास संघासाठी सर्वकाही दिले आहे आणि यापुढेही एक फलंदाज म्हणून मी टी२० संघाला माझे सर्वोत्तम देत राहिल,’ असेही विराट म्हणाला होता.
???????? ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J
— Virat Kohli (@imVkohli) September 16, 2021
त्याच्या या ट्वीटनंतर विराटच्या कारकिर्दीत बदलाचे वारे वाहू लागले. या ट्वीटच्या ३ महिन्यांनंतर म्हणजेच डिसेंबरच्या सुरुवातीला विराटकडून वनडे संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे काढून घेण्यात आली. मर्यादित षटकांमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार नकोत, या कारणाचा हवाला देत बीसीसीआयने रोहित शर्माला टी२० सह वनडेचाही कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले. परिणामी विराटने आपल्या हाती असलेले कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले आहे.
रोहितचे कर्णधार बनणे निश्चित
विराटनंतर आता रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार बनणे जवळजवळ निश्चित आहे. याचे संकेत बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच दिले होते, जेव्हा अजिंक्य रहाणेला कसोटीच्या उपकर्णधारपदावरून काढून रोहितला त्याची जागा देण्यात आली होती. त्यामुळे आता कसोटीचे कर्णधारपदही त्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच रोहितच्या अनुपस्थित केएल राहुल संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकलंत का? धोनी नव्हे विराटने आपल्या मोठ्या निर्णयाविषयी सर्वात आधी ‘या’ व्यक्तीला दिलेली माहिती
हेही पाहा-






