मुंबई । बॉलिवूडचा स्टार अॅक्टर सुशांत सिंग राजपूत याने रविवारी आत्महत्या करुन जगाचा निरोप घेतला. 34 वर्षीय सुशांतची ही बातमी ऐकताच अनेकांना धक्का बसला. भारतासोबत पाकिस्तान आणि इंग्लंडमधील क्रिकेटपटूंना देखील सुशांतची बातमी ऐकून चांगलाच धक्का बसला आहे.
सुशांतची बातमी ऐकताच इंग्लंडची दिग्गज महिला क्रिकेटपटू आणि समालोचक ईशा गुहा हिलादेखील धक्का बसला आहे. मूळ भारतीय असलेल्या ईशाने ट्विट करत लिहले की, “सुशांत एक चांगला माणूस होता.” इंग्लंड बरोबरच पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना देखील सुशांतची बातमी ऐकून धक्का बसला आहे.
No no no no no!!!! He was such a beautiful soul and kind human. Thoughts and condolences to his family 🌹🌹❤️❤️#ripsushantsinghrajput
— Isa Guha (@isaguha) June 14, 2020
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने लिहिले की, ” ही बातमी ऐकून मी खूप दुःखी झालो. सुशांतसिंग राजपूत याला एमएस धोनी विषय चित्रपटात पाहिले होते. तो खूपच मेहनती माणूस होता.
Very sad to hear about such a precious loss of life. I had seen #SushanthSinghRajput's perfect portrayal of #MSDhoni. He was a very hardworking young man. pic.twitter.com/1lcd1ZDRUu
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) June 14, 2020
शोएब मलिक म्हणाला की,” सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली हे ऐकून मी खूपच हैराण झालो. वय वर्षं 34 हे जग सोडण्याचे वय नाही.”
– Shocked to hear about Shushant Singh commiting suicide, life is a long beautiful inning, 34 was not the age to let go, may your soul rest in peace #ShushantSinghRajput (1986-2020) gone too soon.
— Shoaib Malik 🇵🇰 (@realshoaibmalik) June 14, 2020
सुशांतचे क्रिकेट वर खूप प्रेम होते. क्रिकेटपटू होण्याचे त्याचे स्वप्न देखील होते. त्याने क्रिकेटला आपले आयुष्यही मानले. काही वेळ तो क्रिकेट खेळला. त्यामुळे धोनीच्या चित्रपटात काम करताना त्याला अडचणी आल्या नाहीत. भारतीय संघाकडून क्रिकेट खेळावे अशी त्याची मनोमन इच्छा होती. पण त्याने मध्येच क्रिकेट खेळण्यास सोडून दिले. आज जर का तो क्रिकेट खेळत राहिला असता तर महेंद्रसिंग धोनीबरोबर क्रिकेट खेळताना भारतीय संघात दिसून आला असता.
2016 साली एका मुलाखतीत सांगितले होते की, “तो धोनीचा जबरा फॅन होता. धोनीला गेल्या दहा वर्षांपासून भारतीय संघाकडून खेळताना पाहतो. माझी बहीण मितू ही एक राज्यस्तरीय क्रिकेटर आहे. तिने खूप कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जेव्हा मी आठवीच्या वर्गात होतो तेव्हा मी क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिले होते, पण माझ्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे मी क्रिकेट सोडून इंजिनिअरिंगचे क्षेत्र निवडले आणि त्यानंतर पुन्हा अभिनयात कारकीर्द घडवण्याचा निश्चय केला.”