सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विक्रमानंतर विक्रम करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शुक्रवार (29 नोव्हेंबर) रोजी झारखंड विरुद्ध अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यादरम्यान इशान किशनने 334.78 च्या स्ट्राइक रेटने धमाकेदार खेळी खेळून इतिहास रचला. त्याच्या या खेळीच्या जोरावर झारखंडचा संघही विश्वविक्रम करण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात अरुणाचल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि केवळ 93 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग झारखंडने अवघ्या 27 चेंडूत केला. ज्यात इशान किशनने 5 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकार ठोकले. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
अरुणाचलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु संघ अवघ्या 93 धावांत आटोपला. एकाही फलंदाजाला 14 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. अनुकुल रॉय ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने नुकतेच आयपीएल लिलावात 40 लाख रुपयांना विकत घेतले. त्याने चार विकेट घेत खळबळ माजवला. तर रवी यादवने तीन विकेट्स घेतल्या.
ISHAN KISHAN SCORED 77* RUNS FROM JUST 23 BALLS WITH 5 FOURS & 9 SIXES 🥶
– Jharkhand chase down 94 runs from just 4.3 overs in SMAT…!!!! pic.twitter.com/W41b4OanhW
— Johns. (@CricCrazyJohns) November 29, 2024
प्रत्युत्तरात झारखंडने अवघ्या 27 चेंडूत हे लक्ष्य पार केले. या दरम्यान इशान किशनने केवळ 23 चेंडूत 334.78 च्या स्ट्राईक रेटने 77 धावा केल्या. स्पर्धेच्या इतिहासातील स्ट्राइक रेटच्या बाबतीत किशनची खेळी कोणत्याही खेळाडूने (ज्याने 20 पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला) सर्वात वेगवान खेळी आहे. त्याने अनमोलप्रीत सिंगला (334.61) थोड्या फरकाने मागे टाकले आहे.
सुरेश रैना (348) नंतर कोणत्याही भारतीयाची ही दुसरी सर्वात वेगवान खेळी आहे. रैनाने आयपीएल 2014 च्या क्वालिफायर 2 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध 25 चेंडूत 87 धावांची शानदार खेळी केली होती.
इशान किशनच्या या खेळीने झारखंडने विश्वविक्रमही केला. अरुणाचल प्रदेशविरुद्ध धावांचा पाठलाग करताना संघाचा धावगती 20.88 होता. जो टी20 क्रिकेटच्या इतिहासात किमान 1 षटक खेळणाऱ्या संघांमध्ये सर्वाधिक आहे. झारखंडने रोमानियाचा विश्वविक्रम (20.47) मोडला जो त्यांनी 2021 मध्ये सर्बियाविरुद्ध केला होता.
हेही वाचा-
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; दुखापतीतून परताणारा मोहम्मद शमी पुन्हा जखमी!
आयसीसीचा पाकिस्तानला अल्टिमेटम! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारा, नाहीतर….
IND vs AUS: संघाला मोठा धक्का! दुसऱ्या कसोटी सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर