---Advertisement---

अरे बापरे! इशान किशनच्या पदार्पणाच्या दिवशी गर्लफ्रेंडने केलं असं काही, पाहून वाटेल आश्चर्य 

On: मंगळवार, मार्च 16, 2021 10:37 AM
---Advertisement---

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारताच्या या विजयात युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याने सिंहाचा वाटा उचलला. सलामीला फलंदाजीला येत त्याने ताबडतोब अर्धशतक झळकावले. त्याच्या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर इशानची प्रेयसी आदिती हुंडिया ही एका विचित्र मुद्द्यावरुन चर्चेत आली आहे.

त्याचे झाले असे की, इशानच्या टी२० पदार्पणाच्या दिवशी आदितीने तिच्या चेहऱ्यावर रक्त लावले होते. यावेळचा आपला फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ठेवला होता. त्यामुळे नेटकरी तिला अशा अवस्थेत पाहून थक्क झाले होते.

खरे तर, आदितीने पीआरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाज्मा थेरपी केली आहे. याद्वारे चेहऱ्याशी संबंधित गोष्टींवर उपचार केला जातो. यावेळी शरीरातील जवळपास २० ते ३० मिलीलीटर रक्त काढले जाते. त्या रक्ताला प्लाज्मामध्ये बदलून इंजेक्शनद्वारे चेहऱ्यावरील आवश्यक जागी इंजेक्ट केले जाते. यामुळे त्वचेमधील कोलाजनचे प्रमाण वाढते आणि सुरकुत्या, वाढत्या वयानुसार चेहऱ्यावरील त्वचेत होणाऱ्या बदलांचे प्रमाण कमी होते.

आदितीने केले होते इशानचे अभिनंदन
पदार्पणवीर इशानच्या प्रशंसनीय कामगिरीनंतर आदितीने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी ठेवत तिने इशानचे अभिनंदन केले होते. इशानसोबतचा आपला फोटो स्टोरीमध्ये जोडत तिने ‘मुबारक हो मेरे क्यूटी’ असे लिहिले होते.

कोण आहे आदिती?
इशानची प्रेयसी आदिती ही एक मॉडल आहे. तिने २०१७ साली मिस इंडियामध्ये सहभाग घेतला होता. ती मिस इंडिया ऑफ राजस्थानची विजेती राहिली आहे. याबरोबरच मिस डीवा २०१८ स्पर्धाही तिने जिंकली आहे. मिस डीवा सुपरनॅशनलचाही ताज तिला मिळाला आहे. एवढेच नव्हे तर, पोलंडमधील प्रतिष्ठित मिस सुपरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे.

इशान किशनची कामगिरी
भारतीय सलामीवीर शिखर धवनच्या जागी दुसऱ्या टी२० सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्यात सलामीला फलंदाजीला येत त्याने ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. दरम्यान ४ षटकार आणि ५ चौकार मारले. याबरोबरच कर्णधार विराट कोहलीसोबत मिळून अर्धशतकी भागिदारी रचली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

ही कसली दुविधा! तिसऱ्या टी२० सामन्यात रोहितला संधी दिल्यास भारताचं ‘मोठं नुकसान’, पाहा कसं

व्वा इशान! इंग्लंडविरुद्धच्या प्रदर्शानाने चक्क मुख्यमंत्र्यांना पाडलं प्रेमात, कॉल करत दिल्या शुभेच्छा

पदार्पण केलं पण फलंदाजी राहिली, तिसऱ्या टी२०त सूर्यकुमारसाठी बलिदान देणार का कोहली?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---