---Advertisement---

आई फक्त तुझ्याचमुळे! मुंबईच्या इशान किशनने फलंदाजीचे श्रेय दिले आईला

On: रविवार, नोव्हेंबर 1, 2020 8:55 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील 51 वा सामना शनिवारी (31 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात युवा मुंबईचा सलामीवीर इशांत किशनने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईने हा सामना एकहाती जिंकला. या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीचे रहस्य सांगितले.

आईच्या जेवणाला दिले श्रेय
किशन लांबलचक षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. सामना संपल्यानंतर इशान किशन म्हणाला की “खेळपट्टीवर खेळणं सोपं नव्हतं. पहिल्या काही षटकात चेंडू बॅटवर येत नव्हता. मी सतर्क राहून फलंदाजी करत होतो आणि खराब चेंडूंची वाट पाहत होतो. या सर्व गोष्टी सराव सत्रांवर आणि आपल्या प्रशिक्षणावर अवलंबून असते. जर माझ्या ताकदीचा प्रश्न असेल, तर याचे श्रेय माझ्या आईच्या जेवणाला जाते. तिच्या हातून मिळालेलं जेवण मला सामर्थ्यवान बनवते आणि कधीकधी मला आश्चर्य वाटते की माझे षटकार इतके लांब कसे जातात.”

ऑफ साईडवर फटके मारण्याचा केला सराव
पुढे बोलताना ईशान म्हणाला की “माझ्या प्रशिक्षकांनी मला सांगितले की ऑफ-साइडवर फटके मारणे महत्वाचे आहे. सुरुवातीला मला ती गोष्ट अवघड वाटली. अगदी राहुल द्रविड सरांनी मला सांगितले की ऑफ-साइडवर फटके कसे मारायचे यावर काम करण्याची गरज आहे, त्यामुळे सध्याच्या हंगामात मी यावर काम करत आहे आणि ते सामन्यात दिसून येत आहे. मला प्रत्येक क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. संघ व्यवस्थापनाने कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला संधी दिली तरी चालेल. या टप्प्यावर तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम असले पाहिजे.”

मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी
मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. 13 सामन्यात 9 विजय आणि 4 पराभवानंतर या संघांचे 18 गुण आहेत. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

मुंबईने मिळवला विजय
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत केवळ 110 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईने 14.2 षटकांत 1 गडी गमावून सहजपणे विजय मिळवला. या सामन्यात सलामीवीर इशांत किशनने 47 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---