भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहून चांगलाच प्रभावित झाला आहे. सूर्यकुमार मागच्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघासाठी सर्वात आक्रमक पद्धतीने खेळला आहे. विराट कोहलीच्या साथीने त्याने टी-20 विश्वचषक गाजवला. सध्या संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून याठिकाणीही सूर्याने त्याच्या फॉर्म कायम ठेवला आहे. अशात भारतीय संघातील युवा खेळाडूंसाठी सूर्यकुमार नक्कीच एक आदर्श ठरत आहे. युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन यालाही सूर्यकुमारकडून अनेक गोष्टी शिकता येत आहेत. इशानने स्वतः सूर्यकुमारखी फलंदाजी करू इच्छित असल्याचे म्हटले जात आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघासाठी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये सर्वात्तम फलंदाजी करणारे खेळाडू ठरले. या दोघांच्या वादळी प्रदर्शनामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला, पण त्यांना अंतिम सामन्यात जागा पक्की करता आली नाही. विश्वचषकानंतर भारतीय संघ टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये पोहोचला. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत विराट कोहली विश्रांतीवर होता, पण सूर्यकुमार मात्र त्याचा फॉर्म कायम राखताना दिसला. दुसरीकडे इशान किशन (Ishan Kishan) मात्र सलामीवीराच्या रूपात खेळताना दिसला. पण त्याला प्रदर्शन मात्र अपेक्षित नव्हते. अशात त्याने सूर्यकुमार यादवसारखी फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली.
इशान किशन म्हणाला की, “जेव्हा सूर्यकुमार यादव फलंदाजी करत असेल, तेव्हा नक्कीच मला नॉन स्ट्राईक एंडवर थांबायला आवडेल. सूर्यकुमार फलंदाजी खूप सोपी बनवतो. भारतीय संघातील आम्ही सर्वजण त्याच्यासारखी फलंदाजी करू इच्छितो. तो प्रत्येक वेळी खूप शांत राहतो. माझ्या मते सर्व गोष्टी त्यांच्या रणनीतीनुसार घडतात. मी अनेक वर्ष त्याच्यासोबत खेळलो आहे. तो त्याचे हायड्रेशन, झोपची वेळ आणि डायट याविषयी खूप प्रोफेशनल आहे. आम्ही युवा खेलाडू त्याच्याकडून खूपकाही शिकू शकतो. त्याची एनर्जी आणि काम करण्याची पद्धत अशी आहे की, नेहमी 100 टक्के योगदान देतो.”
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने विस्फोटक खेळी केली. त्याने या सामन्यात अवघ्या 51 चेंडूत नाबाद 111 धावा कुटल्या. यामध्ये 11 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावर भारताने 65 धावांनी विजय मिळवला. सूर्यकुमार यादव या टी-20 मालिकेत मालिकावीर देखील ठरला. (Ishan Kishan has expressed his desire to bat like Suryakumar Yadav)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पूरननंतर आता कोण करणार वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व? ‘या’ खेळाडूचे नाव चर्चेत
भारत- बांगलादेशमधील तिसऱ्या वनडेच्या दिवशीच आंदोलन, यजमानांच्या बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय