---Advertisement---

भारतीय संघात निवड न झालेल्या इशान किशनची स्फोटक खेळी पाहिलीय का?

On: शुक्रवार, नोव्हेंबर 6, 2020 12:24 AM
---Advertisement---

आयपीएल २०२० मधील प्लेऑफच्या सामन्यांना गुरुवारपासून(५ नोव्हेंबर) सुरुवात झाली. गुरुवारी क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात ५७ धावांनी विजय मिळवत मुंबईने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मुंबईच्या विजयात इशान किशनने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याच्या फलंदाजीचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

इशान या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने यावेळी आक्रमक फलंदाजी करताना केवळ ३० चेंडूत नाबाद ५५ धावा फटकावल्या. या खेळीत त्याच्या ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तसेच हे त्याचे आयपीएल २०२० मधील चौथे अर्धशतक होते. त्याच्या या खेळीचे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले असून त्यांनी त्याचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत.

https://twitter.com/RJVV55/status/1324385253004201984

https://twitter.com/imPVK94/status/1324387365201195008

https://twitter.com/Naniricci45/status/1324378382541361152

https://twitter.com/The_Akshat_18/status/1322584028067758082

इशान किशनसाठी आयपीएल२०२० चा हंगाम ठरला खास-

इशानने या आयपीएल हंगामात १३ सामन्यात खेळताना १२ डावात फलंदाजी केली. त्यात त्याने ५३.६६ च्या सरासरीने ४८३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ अर्धशतकांचा समावेश आहे. तो आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे तो यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणाराही क्रिकेटपटू आहे. त्याने २९ षटकार आत्तापर्यंत मारले आहेत.

भारतीय संघात झाली नाही निवड –

यंदा आयपीएलमध्ये दमदार कामिगिरी करुनही इशानला या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही, याबद्दल अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

इशान किशनची आयपीएल २०२०मधील कामगिरी एकदा पाहाच, तुम्हालाही वाटेल…

आयपीएलचा बाप तो बापच! शून्यावरती ३ बाद, मुंबईकडूनच मुंबईकरांची दांडी गुल

भाई, आता चषक आपलाच..! मुंबई इंडियन्ससाठी लकी असणाऱ्या ‘त्या’ आजीबाई दिसल्या दुबईत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---