गुरुवार(५ नोव्हेंबरपासून) आयपीएल२०२० च्या हंगामातील प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली. पहिल्या क्वॉलिफारयरमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने आले होते. या सामन्यादरम्यान कॅमेरात एका आजींना सतत दाखवले जात होते. त्यामुळे सध्या त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. तसेच या आजी मुंबई इंडियन्ससाठी लकी असल्याचे म्हटले जात आहे.
नक्की का होतेय त्या आजीबद्दल चर्चा –
२०१७ च्या आयपीएल हंगामातील अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघात झाला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने केवळ १ धावेने विजय मिळवला. या सामन्यात पुणे संघाला ४ चेंडूत ७ धावा हव्या असताना कॅमेरा एका वयस्कर महिलेवर गेला, त्यात त्या आजी प्रार्थनेमध्ये गुंग असल्याचे दिसले होते. त्यामुळे वारंवार कॅमेरा आजींवर येऊन ठेपत होता. त्यामुळे त्या आजींचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तसेच त्यावेळी सोशल मीडियाने मुंबई इंडियन्सच्या जिंकण्याचे एक कारण म्हणजे या आजींची प्रार्थना असे चित्र उभे केले होते.
विशेष म्हणजे त्याच आजी गुरुवारी मुंबई विरुद्ध दिल्ली संघातील सामन्यादरम्यानही दिसल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे की मुंबई इंडियन्सच्या लकी आजी पुन्हा दिसल्या आहेत आणि त्यामुळे मुंबई इंडियन्स सामना जिंकणार. खास गोष्ट म्हणजे मुंबईची कामगिरीही या सामन्यात शानदार झाली. त्यांनी २०१ धावांचे आव्हान दिल्लीला दिले. एवढेच नाही तर दिल्लीचे पहिले ३ फलंदाज शुन्यावर बाद झाले. विशेष म्हणजे या सामन्याला मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण निता अंबानींच्या परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.
https://twitter.com/AniketDolas_/status/1324392210117259264
https://twitter.com/Kakarla07/status/1324389499548233728
https://twitter.com/arghya_Manna_/status/1324394943264141312
कोण आहेत त्या आजी –
२०१७ ला त्या आजी चर्चेत आल्यानंतर नक्की त्यांची ओळख काय असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावेळी अभिषेक बचन्नने ट्विटरवर या आजी कोण आहेत याचा खुलासा केला.
https://twitter.com/juniorbachchan/status/866536517325307904
त्याने सांगितले की या आजी इतर कोणी नसून रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची सासू आणि मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांच्या आई आहेत, त्याचे नाव पूर्णिमा दलाल आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL प्लेऑफ सामन्यांच्या वेळेवर ‘या’ दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न, म्हणाला…
इशान किशनची आयपीएल २०२०मधील कामगिरी एकदा पाहाच, तुम्हालाही वाटेल…
आयपीएलचा बाप तो बापच! शून्यावरती ३ बाद, मुंबईकडूनच मुंबईकरांची दांडी गुल
ट्रेंडिंग लेख –
-आज वाढदिवस असणाऱ्या विराट कोहलीने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!






