भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे आणि यजमान संघासोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना गुरुवारी (20 जुलै) रोजी सुरू होत आहे. कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील वनडे आणि टी-20 मालिका होईल आणि नंतर संघ आयर्लंड दौऱ्यावर जाईल. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यानतंर 27 जुलैपासून उभय संघात तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू होईल. तसेच वनडे मालिकेनंतर पाच टी-20 सामन्यांची मालिका 3 ते 13 ऑगस्टदरम्यान खेळली जाणार आहे. यानंतर मात्र भारताचा वेस्ट इंडीज दौरा संपेल आणि संघ थेट आयर्लंडसाठी रवाना होईल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात संजू सॅमसन (Sanju Samson) आणि ईशान किशन (Ishan Kishan) हे दोन पर्याय आहेत. पण यापैकी एकटा संजू सॅमनस आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसू शकतो.
आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाला तीन टी-20 सामन्यांची मालिका खेलायची आहे. ही मालिका 18 ते 23 ऑगस्टदरम्यान आयोजित केली गेली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार संजू सॅमसनला आयर्लंडविरुद्धच्या तिन्ही टी-20 सामन्यात संजू सॅमसन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. ईशान किशनला या दौऱ्यात विश्रांती दिली जाण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. आशिया चषक 2023च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणजेच आशिया चषकासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. 30 ऑगस्ट पासून आगामी आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशात खेळला जाणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने पाकिस्तानबाहेर म्हणजेच श्रीलंकेत खेळणार आहे.
दुसरीकडे आयर्लंडविरुद्ध संधी मिळणार असल्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन्ही मालिकांमध्येही सॅमसनचे नुकसान होताना दिसू शकते. वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेत ईशान किशनला खेळण्याची संधी अधिक मिळेल, असेही सांगितले जात आहे. असे असले तरी, वेस्ट इंडीजविरुद्ध सॅमसनला संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले, तर संघ व्यवस्थापनावर दबाव येऊ शकतो आणि त्याला पुढच्या सामन्यातही निवडले जाऊ शकते. अशात येत्या काळातील प्रत्येक सामना सॅमसनसाठी महत्वाचा असणार आहे. सॅमसनने आपला शेटचा आंतरराष्ट्रीय सामना 3 जानेवारी 2023 रोजी खेळला होता. तेव्हापासून तो भारतीय संघात पुनरागमनाची वाट पाहत आहे.
महत्वाच्या बातम्या –
Ashes 2023 । ख्रिस वोक्सने घेतलं विकेट्सचं पंचक! दुसऱ्या दिवशी 18 धावां करून ऑस्ट्रेलिया सर्वबाद
मोईन अलीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला लॅब्यूशेन, चेंडू मिस करताच झाला मोठा गेम, पाहा व्हिडिओ