टी२० विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला ‘हिट किंवा मिस’ (मोठा शॉट खेळणारा किंवा बाद होणारा) खेळाडू म्हटले गेले होते. मात्र, ईशानच्या माजी प्रशिक्षकांच्या मते तो त्याप्रकारच खेळाडू नाही. त्यांच्या मते तो पुढच्या काही वर्षांमध्ये भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातील महत्वाचा खेळाडू असेल.
तत्पूर्वी टी२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने १० विकेट्सने भारताचा पराभव केला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ईशान किशनला रोहित शर्माच्या जागेवर डावाची सरुवात करण्याची संधी दिली गेली होती, पण तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही.
न्यूझीलंडविरुद्ध सलामी करण्याची संधी मिळाली, पण ईशान एक मोठा शॉट खेळण्याच्या नादात स्वस्तात विकेट गमावून बसला. त्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ईशानला ‘हिट किंवा मिस खेळाडू’ म्हटले होते. पण आता ईशान लहान असतानाचे त्याचे प्रशिक्षक उत्तम मजूमदार यांनी ईशानची पाठराखण केली आहे.
त्यांच्या मते त्याच्यासाठी अजून काहीच संपलेले नाही. तो एक उपयुक्त खेळाडू आहे, जो क्रिकेटच्या लहान प्रकारात सर्वात उपयुक्त आहे. तो डावाची सुरुवात करू शकतो, तसेच एका फिनिशरचीही भूमिका पार पाडू शकतो. तो खूप चपळ आणि अप्रतिम यष्टीरक्षक आहे.
ईशानचे माजी प्रशिक्षक म्हणाले की, कोणत्याही खेळाडूला अपयशाला समोरे जावे लागू शकते. हे दुर्दैवी ठरले की, तो मोठ्या सामन्यात बाद झाला. पण, जर संघाची ही रणनीती यशस्वी झाली असती, तर रातो रात स्टार झाला असता. त्यांनी विश्वचषकापूर्वी ईशानने खेळलेल्या तीन डावांचे पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, ज्याप्रकारे त्याने तीन डावांमध्ये फलंदाजी केली होती, ते पाहता अजून संधी मिळाल्या पाहिजे होत्या. ईशानने विश्वचषकापूर्वी आयपीएलमध्ये नाबाद ५० आणि ८४ धावा केल्या होत्या. तसेच विश्वचषकाच्या सराव सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध ७० धावा केल्या होत्या.
तो खूप नैसर्गिक गुणवत्ता असलेला खेळाडू आहे आणि मोठे शॉट खेळायला घाबरत नाही. त्यादिवशी त्याला पॉवर प्लेमध्ये मोठा शॉट खेळण्यासाठीच पाठवले गेले होते, पण दुर्दैवाने तो त्याचा दिवस नव्हता. असे असले तरी, त्याला अजून संधी मिळतील. राहुल द्रविड प्रशिक्षक बनल्यानंतर ईशानला जास्त फायदा मिळाला पाहिजे. द्रविड सर त्याला चांगल्या प्रकारे ओळखतात. कारण ईशान २०१६ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषकात संघाचा कर्णधार होता. त्याने भारत ए संघाचे देखील नेतृत्व केले आहे. सलग दोन विश्वचषकात त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. अजून तर त्याची सुरुवात आहे, असे ईशानच्या माजी प्रशिक्षकांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित, चहल, गप्टीलसह ‘हे’ खेळाडू भारत-न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यांत करू शकतात खास विक्रम
टी२० वर्ल्डकपमधील पराभवानंतर पाकिस्तानची नवीन सुरुवात, खेळाडूंच्या फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल