भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात तारांकित पद्धतीने केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पदार्पण करताना फलंदाजावर दबाव असला तरीही ईशानने एकदिवसीय आणि टी-20 पदार्पणात अर्धशतके केली. लांब षटकार मारण्याच्या त्याच्या क्षमतेने चाहत्यांना एमएस धोनीची आठवण करून दिली. तसे पाहिले तर, किशन आणि धोनीमध्ये बरेच साम्य आहे.
हे दोन्ही शिलेदार झारखंडचे आहेत आणि यष्टीरक्षक फलंदाज आहेत. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीने आधीच खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तर, किशनची सध्या सुरुवात आहे. नुकत्याच झालेल्या एका संभाषणात किशनने धोनीसोबतच्या त्याच्या नात्यावर प्रकाश टाकला आहे. त्याने अनुभवी यष्टीरक्षक फलंदाजाकडून शिकण्याची इच्छा असलेल्या एका गोष्टीबद्दल देखील सांगितले आहे.
ईशानने आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवर मुलाखतीदरम्यान सांगितले की, “खूप कमी खेळाडू आहेत जे त्यांच्या देशासाठी खूप काही देऊ शकतात. आपणा सर्वांना माहिती आहे की, क्रमांक 3 वरील फलंदाजाला क्रमांक 6 पर्यंत फलंदाजी करणे खूप अवघड जाते. परंतू, धोनीने बराच काळ भारतीय संघासाठी खालच्या फळीतही फलंदाजी केली आहे. हीच गोष्ट त्याला इतरांपासून वेगळे बनवते. मलाही संघासाठी हेच करायचे आहे. फक्त मैदानावर जा आणि संधी मिळेल तिथे कामगिरी करा.”
किशन पुढे म्हणाला की, “धोनीने त्याला यष्टीरक्षणाबाबत अनेक टिप्स दिल्या आहेत. जेव्हा मी त्याच्याशी बोलतो तेव्हा सहसा यष्टीरक्षणाबद्दल किंवा जेव्हा आम्ही आयपीएल दरम्यान भेटतो तेव्हा मी त्यावेळी मला जे वाटेल ते शेअर करतो. उदाहरणार्थ, मी त्याला सांगतो, भैया, मी एका सामन्यातील चांगल्या कामगिरीनंतर पुढे चांगले खेळू शकत नाही. आणि तो म्हणतो, असे होऊ शकते की, कामगिरीनंतर तुमची भूक कमी होते आणि तुम्ही तुमच्या प्रदर्शनावर पुरेसे लक्ष केंद्रित नाही.”
गेल्या महिन्यात भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर किशन शेवटचा खेळताना दिसला होता. या दौऱ्यात त्याने काही प्रभावी खेळी खेळल्या आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघात आपला दावा ठोकला. जागतिक स्पर्धेत सामील होण्यासाठी त्याला आयपीएल 2021 च्या उर्वरित भागांमध्ये आपली तगडी धाव सुरू ठेवणे आवश्यक आहे. धोनी देखील आयपीएलमध्ये सहभागी होताना दिसणार आहे आणि अनेकांच्या नजरा त्याच्या कामगिरीवरही असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
रूटची गाडी सुसाट! ९००० कसोटी धावा करताना केली ‘ही’ दैदिप्यमान कामगिरी; तेंडुलकरलाही टाकले मागे
नऊ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच रूटने केली ‘ही’ खास कामगिरी
रहाणे आणि पुजारा यांना संघातून काढून टाकण्याच्या मागणीवर केएल राहुलने केले “असे” भाष्य