यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League 2025) सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबादने (SRH) एक आंतर-संघ सामना खेळला. हा सामना हैदराबाद अ आणि हैदराबाद ब संघात खेळवण्यात आला. यामध्ये, ईशान किशनने (Ishan Kishan) एक तुफानी खेळी केली, त्याने केवळ 16 चेंडूत अर्धशतक झळकावले. अभिषेक शर्मानेही जलद गतीने 28 धावांची प्रभावी खेळी खेळली. या संघाने शेवटच्या हंगामात आपल्या फलंदाजीमुळे सर्व संघांमध्ये भीती निर्माण केली होती.
संघाच्या अंतर्गत सामन्यात ईशान किशनने 23 चेंडूत 64 धावांची शानदार खेळी केली. 15 चेंडूत 47 धावांवर खेळणाऱ्या किशनने षटकार मारून अर्धशतक झळकावले. सध्या ईशान चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या किशनला यावेळी हैदराबादने 11 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केले आहे.
हैदराबाद अ साठी 64 धावा काढल्यानंतर, किशनने हैदराबाद ब साठी देखील फलंदाजी केली, ज्यामध्ये त्याने 30 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. या डावात त्याने 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर तो 70 धावांवर नाबाद तंबूत परतला.
Ishan Kishan scored a half-century in just 16 balls during SRH's intra-squad match😎📸💥@ishankishan51 #IshanKishan #SRH #IPL2025 #PlayWithFire pic.twitter.com/Vc1UiJAEZM
— Ishan's🤫🧘🧡 (@IshanWK32) March 15, 2025