इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) अखेरचा साखळी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान खेळला जात आहे. अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकात ९ बाद २३५ धावांची मजल मारली. या डावाच्या पावर प्लेमध्ये तुफानी फटकेबाजी करत मुंबईच्या सलामीवीरांनी एक नवा उच्चांक गाठला.
मुंबईच्या सलामीवीरांची आतिषबाजी
प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात मुंबईचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशनने भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीतील सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत पावर प्लेमध्ये तब्बल ८३ धावा लुटल्या. रोहितने १८ धावांचे योगदान दिले तर, ईशान किशनने १६ चेंडूवर अर्धशतक जमवले. यादरम्यान दोघांनी मुंबई इंडियन्ससाठी एका नव्या विक्रमाची नोंद केली.
पावर प्लेमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या
रोहित ईशान जोडीने पहिल्या सहा षटकात ८३ धावा करताना मुंबईसाठी आयपीएल इतिहासातील पावर प्लेमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यापूर्वी २०१८ आयपीएलमध्ये त्यांनी दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध मुंबईच्या मैदानावर ८४ धावा जमविल्या होत्या. इंदोर येथे २०१७ आयपीएलवेळी त्यांनी पंजाब विरुद्ध ८२ धावा जोडलेल्या.
हैदराबादचा पराभव
अबुधाबी येथील या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना धावांची अक्षरशा लयलूट केली. ईशान किशनने ८४ तर, सूर्यकुमार यादवने ८२ धावा चोपल्या. हैदराबादसाठी जेसन होल्डरने सर्वाधिक चार बळी मिळविले. प्रत्युत्तरात, अभिषेक शर्मा व जेसन रॉय यांनी ५.२ षटकात ६४ धावांची सलामी दिली होती. तसेच मनिष पांडेने ६९ धावांची नाबाद खेळी केली. पण त्यांना हैदराबादला विजय मिळवून देता आला नाही. हैदराबादने २० षटकांत ८ बाद १९३ धावाच केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नरने घेतला हैदराबादच्या चाहत्यांचा निरोप, लिहिला भावूक संदेश
टी२० विश्वचषकाच्या भारतीय संघात बदल होण्याची शक्यता; विराट-रोहित बीसीसीआयच्या बैठकीत होणार सामील
ईशान-सूर्यकुमारचा डबल धमाका! ४ वर्षांपूर्वीच्या सुनील नरेन-ख्रिस लिनच्या विक्रमाची केली बरोबरी