भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने संपले असून तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे २५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सामन्यामध्ये भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
झहिर खानला टाकू शकतो मागे
इशांत शर्माला जर हेडिंग्ले येथे होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या ११ जणांच्या संघात संधी मिळाली तर त्याला झहीर खानला मागे टाकण्याची संधी मिळेल. जर इशांतने या कसोटीत १ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या, तर तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत झहिरला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर येईल.
सध्या झहिर आणि इशांत प्रत्येकी ३११ विकेट्ससह संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच या यादीत ६१९ विकेट्ससह अनिल कुंबळे अव्वल क्रमांकावर आहे.
कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज (२४ ऑगस्टपर्यंत) –
६१९ विकेट्स – अनिल कुंबळे (१३२ सामने)
४३४ विकेट्स – कपिल देव (१३१ सामने)
४१७ विकेट्स – हरभजन सिंग (१०३ सामने)
४१३ विकेट्स – आर अश्विन (७९ सामने)
३११ विकेट्स – झहिर खान (९२ सामने)
३११ विकेट्स – इशांत शर्मा (१०३ सामने)
परदेशात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
इशांत शर्माने नुकतेच इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सला झालेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान परदेशात २०० कसोटी विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. तो परदेशात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा चौथा गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत परदेशात ६१ कसोटीत २०४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर २६९ विकेट्स अनिल कुंबळे आहे. तर कपिल देव (२१५) आणि झहिर खान (२०७) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
इशांत शर्माची कसोटी कारकिर्द
इशांत शर्माने त्याच्या कारकिर्दीत १०३ कसोटी सामने खेळले असून ३१.९३ च्या सरासरीने ३११ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने ११ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याची, तर एकवेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
संदीप शर्माची नवी नवरी नताशा सात्विक आहे ज्वेलरी डिझाईनर, जाणून तिच्याबद्दल सर्वकाही
गांजा पिल्याने गावसकरांच्या मित्राचे झालेले निलंबन, केले होते अविस्मरणीय पुनरागमन
लॉर्ड्स कसोटीतील बहुमुल्य योगदानानंतर रहाणेची कुटुंबासोबत मजा-मस्ती, तुम्हीही पाहा