---Advertisement---

लाईव्ह सामन्यात कर्णधार कोहली इशांतला म्हणाला, ‘काय रे, ओरडतोय की विचारतोय’

On: सोमवार, जून 21, 2021 7:46 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२० जून) भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली आणि अवघ्या २१७ धावांवर संघ गारद झाला. प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंड ४९ षटकांनंतर २ बाद १०१ धावा अशा स्थितीत आहे. दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पंचांकडे जोरदार अपील केली होती, त्यावेळी कर्णधार विराट कोहलीने त्याला मजेशीर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले.

तर झाले असे की, न्यूझीलंड संघाकडून सलामीवीर डेवोन कॉनवे फलंदाजी करत असताना इशांत शर्मा २८ व्या षटकात गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर इशांतने पंचांकडे जोरदार मागणी केली होती. ही मागणी इतकी जोरदार होती की, कर्णधार कोहली येऊन इशांतला बोलला की, “तू पंचांकडे मागणी करतोयस की त्यांना ओरडत आहेस.”

जेमिसनची उत्कृष्ट गोलंदाजी
भारतीय संघाला २१७ धावांवर बाद करण्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने मोलाची भूमिका बजावली. भारतीय संघाकडून उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर कर्णधार कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंड संघाकडून काइल जेमिसनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तसेच ट्रेंट बोल्ट आणि निल वॅगनरने २ बाद केले. (Ishant Sharma made a strong appeal against Devon convey)

२५०पेक्षा कमी धावा करण्याची २०वी वेळ
भारतीय संघाने ज्यावेळी प्रथम फलंदाजी करताना २५० पेक्षा कमी धावा केल्या आहेत; त्यावेळी ते न्यूझीलंड संघाला पराभूत करण्यात अपयशी ठरले आहेत. भारतीय संघ २० व्या वेळेस २५० पेक्षा कमी धावांवर सर्वबाद झाला आहे. यापुर्वी भारतीय संघाने १९९५ मध्ये शेवटच्या वेळी न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्यावेळी देखील भारतीय संघाने २५० पेक्षा कमी धावा केल्या होत्या. बेंगलोरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात २२८ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात १४५ तर दुसऱ्या डावात २३३ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

आजा नचले! सामना सुरु असतानाच विराट कोहलीला आली नाचण्याची लहर, पाहा व्हिडिओ

थोडीशी गंमत! तब्बल ६ फूच ८ इंच उंची असलेल्या काईल जेमिसनची भर सामन्यात चाहत्यांबरोबर मस्ती

डेवॉन कॉनवेची विकेट इशांत शर्मासाठी ‘विक्रमी’; कुंबळे, कपिल देव, झहीरच्या पंक्तीत मिळवले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---