भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. आणि मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर खेळला जास्त आहे. सामन्यात इंग्लंड संघ मजबूत स्थितीत आहेत. कर्णधार जो रूट याने २१८ धावा केल्या तर उप कर्णधार बेन स्टोक्स याने ८२ धावांची तुफानी खेळी केली. तर सिबली याला शतक करण्यास अपयश आले आणि तो ८७ धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड संघाने ८ बाद ५५५ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाला करावे लागले परिश्रम
फलंदाजांना बाद करण्यास भारतीय गोलंदाजांना भरपूर परिश्रम करावे लागले आहे. संघासाठी शाहबाज नदीम याने लंचनंतर विकेट मिळवून दिली. नदीम याने आधी बेन स्टोक्स याला (८६ ) बाद केले आणि त्यानंतर जो रूट याला (२१८ ) बाद केले. यानंतर भारतीय संघाने विकेट्स घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर रविचंद्रन अश्विन याने ओली पोप याला ३४ धावांवर बाद केले.
ईशांत शर्माने पटकावल्या २ चेंडूत २ विकेट्स
जोस बटलर आणि डॉमिनिक बेस यांनी सामना सावरण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यावेळी सर्वांना असे वाटत होते की भारतीय गोलंदाज पुन्हा एकदा बॅकफूट वर जातील. पण त्यानंतर भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मा याने २ चेंडूवर लागोपाठ २ विकेट्स घेतल्या. त्याने जोस बटलर याला ३० धावांवर क्लीन बोल्ड केले आणि लगेचच जोफ्रा आर्चर याला ० धावांवर क्लीन बोल्ड केले.
Similar scenes on the very next delivery as well. Ishant Sharma on 🔥 https://t.co/D4Rc6jGJ7E pic.twitter.com/W3y8PEhKIO
— I-Run Man (@JSiddharth23) February 6, 2021
‘हे’ पराक्रम होऊ शकतील ईशांत शर्मा याच्या नावे
आतापर्यंत भारतीय क्रिकेट इतिहासात ३०० पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत ५ गोलंदाजांचे नावं आहेत. ईशांत शर्मा याने आतापर्यंत २९७ विकेट्स पटकावल्या आहेत. जर त्याने ३ विकेट्स घेतल्या तर तो कसोटी सामन्यात ३०० विकेट्स घेणारा ६वा भारतीय गोलंदाज बनू शकतो. अशातच ईशांत शर्मा आपल्या कसोटी कारकिर्दीतील ९८ वा सामना खेळत आहे. या मालिकेतील उर्वरित ३ सामन्यांपैकी २ सामने खेळण्याची संधी मिळाली तर १०० कसोटी सामना खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावी होऊन जाईल. हा पराक्रम करणारा तो ११ वा भारतीय खेळाडू होऊ शकतो.
ईशांत शर्मा याची कामगिरी
ईशांत शर्मा याने आपल्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ च्या अंतिम सामन्यातीलनिर्णायक षटक कोणीही विसरू शकत नाही. त्याने भारतीय संघासाठी एकूण ९८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३.१८ च्या इकॉनॉमी ने २९७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ८० एकदिवसीय सामन्यांमध्ये ११५ विकेट्स पटकावल्या आहेत. तर १४ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
जो रूटला शंभराव्या सामन्यात विजयाची भेट देण्याची आमची इच्छा आहे, बेन स्टोक्सचे प्रतिपादन
आयपीएल गाजवणाऱ्या एनरिच नॉर्टजेची पाकिस्तानविरुद्ध भेदक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
सामन्यासाठी समालोचकांची गरज नाही, एकटा रिषभ पंत पुरेसा, या माजी खेळाडूचे मजेशीर ट्विट