---Advertisement---

ISL 2018: फॉर्मातील नॉर्थइस्ट विरुद्धच्या लढतीसाठी पुणे सिटी संघ सज्ज

On: मंगळवार, नोव्हेंबर 27, 2018 8:15 AM
---Advertisement---

पुणे| हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीची आज ( 27 नोव्हेंबर) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होणार आहे. सध्या नॉर्थइस्टचा संघ फॉर्मात आहे, पण पुणे सिटीला सुद्धा पहिल्या विजयामुळे फॉर्म गवसला आहे.

पुण्याला आपल्या आक्रमणातील क्षमतेची नव्याने जाणीव झाली आहे. त्यामुळे गेमप्लॅन बदलण्याच्या निर्धाराने ते मैदानावर उतरतील. लिगमधील सध्याची चुरस पाहता पुण्याला बाद फेरीची संधी कमी आहे. त्यांचे आठ सामन्यांतून केवळ पाच गुण जमले आहेत, पण चांगल्या निकालांची मालिका साधत पारडे फिरविण्याची त्यांना आशा आहे.

भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय लढतीमुळे लिगला ब्रेक मिळाला होता. त्याचा पुण्याला फायदा झाल्याचे दिसते. जमशेदपूर एफसीवर वर्चस्व राखत पुण्याने पहिला विजय मिळविला. इयन ह्युम दुखापतीमुळे दिर्घ ब्रेकनंतर तंदुरुस्त झाला. त्यामुळेही पुण्याचा संघ भक्कम झाला.

आशिक कुरुनीयन लक्षवेधी खेळ करत आहे. वेग आणि ड्रीबलिंगच्या कौशल्यामुळे तो प्रतिस्पर्धी बचावपटूंसाठी आव्हान ठरतो आहे. हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांना मार्सेलिनीयोकडनही आशा असतील. ब्राझीलच्या या खेळाडूला फॉर्म गवसल्यास तो कोणत्याची संघाचा बचाव भेदू शकतो. नॉर्थइस्टविरुद्ध आक्रमक खेळ करण्याचा रेड्डी यांचा निर्धार आहे. त्यासाठी आघाडी फळीकडून त्यांना आशा असतील.

रेड्डी म्हणाले की, “आम्ही ब्रेकपूर्वी दोन सामन्यांत प्रयत्न केले. त्यात काहीसा बचावात्मक दृष्टिकोन होता, पण आम्हाला अपेक्षित निकाल मिळाले नाहीत. आता आम्ही संघातील आक्रमणाचे पर्याय वापरले. हेत आमच्यासाठी सर्वोत्तम ठरते आहे. आम्हाला त्याची गरज आहे, कारण आम्हाला तीन गुण हवे आहेत. गुणतक्ता पाहिल्यास आम्हाला केरळा ब्लास्टर्सच्या जवळ जाण्याची गरज आहे. ते आमच्या वर सातव्या स्थानावर आहेत. आम्ही त्यासाठी आवश्यक आक्रमक दृष्टिकोन ठेवला आहे.”

असाच आक्रमक दृष्टिकोन दाखवित नॉर्थइस्टने ब्लास्टर्सविरुद्ध विजय खेचून आणला. त्यांनी भरपाई वेळेत दोन गोल केले. या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. पाच मोसमांत प्रथमच बाद फेरी गाठू शकू असा विश्वास त्यांना वाटतो आहे.

पूर्वीच्या मोसमांच्या तुलनेत नॉर्थइस्टकडे चिवट बचाव फळी आहे. सात सामन्यांत त्यांच्याविरुद्ध केवळ आठ गोल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा आघाडी फळीला बरेच पाठबळ मिळाले आहे. बार्थोलोम्यू ओगबेचे याने सात गोल केले आहेत. गोल्डन बूटच्या शर्यतीत तो फेरॅन कोरोमीनास (8) व सुनील छेत्री (5) यांच्या साथीत त्याने आपली दावेदारी भक्कम निर्माण केली आहे.

प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांनी सांगितले की, आमच्यापेक्षा पुण्यावर जास्त दडपण आहे. आम्हाला आमचे स्थान कायम राखण्याची गरज आहे. पुण्याला स्थान उंचावण्याची गरज आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल.

नेदरलँडचे शात्तोरी पुढे म्हणाले की, “पुण्याच्या संघात बरीच वैयक्तिक गुणवत्ता आहे. त्यांच्याकडे काही फार चांगले खेळाडू आहेत आणि ते फरक पाडू शकतात. पुण्याच्या त्रुटी मात्र आम्हाला नीट माहिती आहेत आणि त्याचा फायदा उठवू शकू असे वाटते.”

दोन्ही संघांचा निर्धार पाहता या लढतीत खुप काही पणास लागले असेल. पुणे विजयानंतर सातत्य राखू शकते, तर नॉर्थइस्ट आणखी एक पाऊल पुढे टाकत पहिल्या चार संघांमधील स्थान भक्कम करू शकते.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: दिल्लीला पराभूत करत अपराजित बेंगळुरूची आघाडी

कर्णधार कोहलीला कसोटीत धावा करण्यापासून रोखण्याची आॅस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षकाने व्यक्त केली आशा

बंगळूरु बुल्सच्या पवन सेहरावतचा प्रो कबड्डीत विक्रमांचा धमाका सुरुच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment