बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सलामीचा फलंदाज शुभमन गिल ड्रेसिंग रूममध्ये इतर खेळाडूंशी बोलत आहे. भारताने बांगलादेशला हरवून स्पर्धेतील चौथा विजय नोंदवल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये शुभमन गिल कर्णधार रोहित शर्माशी बोलतो. व्हिडिओच्या मध्यात, सूर्यकुमार यादव गिलला व्हिडिओ एडिट करण्याचा सल्ला देतोय.
व्हिडीओमध्ये सर्वप्रथम शुभमन गिल (Shubhman Gill) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याशी पुढील सामन्याबाबत चर्चा केली. तो म्हणाला की, पत्रकार परिषदेत त्याला कोणीतरी सांगितले होते की, 2003 पासून विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध आपण जिंकलेलो नाही. यानंतर गिल हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे जातो आणि हार्दिकने त्याला विचारले की तू काय करतो आहेस? गिल उत्तर देतो, “तु गेल्या सामन्यात काय केले”. गिलचे उत्तर ऐकून हार्दिक जोरजोरात हसायला लागला.
यानंतर गिल मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याच्याशी बोलतो आणि त्यानंतर शेजारी बसलेल्या सुर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) याला काही तरी विचारतो, ज्याचं उत्तर देताना सुर्यकुमार म्हणतो, “याला पुर्ण एडिट कर.” सुर्याचे हे उत्तर ऐकून इशान किशन (Ishan Kishan) जोरजोरात हसताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सर्व भारतीय खेळाडू खुप मस्ती करतानाही दिसत आहेत.
https://www.instagram.com/reel/CynZqB7MPrl/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
गुरुवारी (19 ऑक्टोबर) भारत आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषकातील 17 वा सामना पुणे येथे झाला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात 8 विकेट्स गमावून 256 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य भारताने 41.3 षटकात 3 विकेट्स गमावून गाठले. या सामन्यात भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) याने सर्वाधिक नाबाद 103 धावा केल्या. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 48 वे आणि आंतरराष्ट्रीय शतक क्रमांक 78 होते. याआधीही त्याने या स्पर्धेत काही चांगल्या खेळी केल्या होत्या. भारताचा विश्वचषक 2023 मधील सलग चौथा विजय आहे. (Isshaan-Hardik’s secret revealed by Surya? Watch the video shared by BCCI)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानचे जोरदार कमबॅक! वॉर्नर-मार्शच्या शतकानंतर ढासळली ऑस्ट्रेलिया, तरीही लक्ष्य मोठेच
मोठी बातमी: विश्वचषकादरम्यानच भारतीय क्रिकेटपटूचा क्रिकेटला टाटा-बायबाय, आता दिसणार नाही…