भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला मंघळवारी नवीन अध्यक्ष मिळाले. सौरव गांगुली मागच्या तीन वर्षांपासून बीसीसीआय अध्यक्षाची जबाबदारी पार पाडत आले होते. आता त्यांच्या जागी भारताच्या विश्वविजेत्या संघाचा भाग राहिलेले रॉजर बिन्नी बोर्डाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. चर्चा अशा आहेत की, टी-20 विश्वचषक 2022 संपल्यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीमध्येही मोठे बदल होऊ शकतात.
चेतन शर्मा (Chetan Sharma) सध्या भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारतीय संघासाठी अनेक युवा खेळाडूंनी पदार्पण केले, पण चाहत्यांमध्ये त्यांच्याविषयी असलेली नाराजी स्पष्ट दिसून येते. अनेकदा चाहत्यांनी निवड समितीविषयी उघड नाराजी व्यक्त केली आहे. सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) खेळला जात आहे. भारतीय संघाकडून या स्पर्धेत चांगल्या प्रदर्शनाच्या अपेक्षा आहेत. पण जर संघ या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही, तर चेतन शर्मा यांनाही या गोष्टीचा फटका बसू शकतो. नाव न घेण्याच्या अटीवर एका बीसीसीआय अधिकाऱ्याने याविषयी माध्यमांना माहिती दिली.
बीसीसीआयचा हा वरिष्ठ अधिकारी माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “टी-20 विश्वचषकात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर खूप काही अवलंबून असेल. चेतन शर्मांवर सध्या अनेकजण नाराज आहेत. पण बीसीसीआय जोपर्यंत क्रिकेट सल्लागार समिती नियुक्त करत नाही, तोपर्यंत शर्मा त्यांच्या पदावर कायम राहतील.” चेतेन शर्मांसाठी ज्या पद्धतीने येणारा काळ सोपा नसेल, तशाच पद्धतीने इस्ट झोनचे देबाशीष मोहंती यांनाही निवड समितीमधील जागा मोकळी करावी लागणार आहे. ते या समितीमध्ये स्वतःचा कार्यकाळ लवकरच पूर्ण करतील.
“करुविलाच्याय देबू मेहंती यांच्यावरही एक नियम लागू होईल. 2019 च्या सुरुवातीला देबूंना अध्यक्षांनी जूनियर पॅनलमध्ये सामील केले होते. त्याठिकाणी त्यांनी दोन वर्ष काम केले होते. देवांग गांधींना स्वतःचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर देबूंना सीनियर पॅनलमध्ये पाठवले गेले होते,” असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
येत्या काही महिन्यात मोहंती निवड समितीमध्ये चार वर्ष पूर्ण करतील. पण सध्या शंका अशी उपस्थित होत आहे की, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना हे पद सोडण्याची वेळ येऊ शकते. त्यांनी जर हे पद सोडले, तर इस्ट झोमध्ये ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी शिव सुंदर दार आणि दीप दासगुप्ता यांची नावे सर्वाधिक चर्चेत असतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आणखी एक धक्का! मॅचविनर विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर
प्रो कबड्डी: अखेरच्या सेकंदात पुणेरी पलटणचा थरारक विजय; पुणेकर अस्लम इनामदार ठरला हिरो