कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच आयपीएल तेव्हाही सुरु होईल की नाही याची कोणतीही शाश्वती नाही.
यावर भारताचा माजी खेळाडू व समालोचक आकाश चोप्राने भाष्य केले आहे. “आयपीएल नक्की 15 एप्रिलला सुरु होईल की नाही याबद्दल काहीही खात्री देता येत नाही. जर आयपीएल झालीच तर ती एकाच शहरात खेळवली जाऊ शकते. ” असे त्यांनी आपल्या युट्यूब व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
आकाश चोप्रा हा स्टार स्पोर्ट्स इंडियाच्या ब्राॅडकास्टर समालोचकांच्या पॅनेलचा सदस्य असुन गेली अनेक वर्ष आयपीएलमध्ये समालोचन करत आहे.
याच व्हिडीओमध्ये एमएस धोनीचे महत्त्व अधोरेखित करताना चोप्राने म्हणाला, आयपीएलमध्ये धोनीसारख्या खेळाडूंना प्रचंड महत्त्व आहे. धोनीला कधी कशी कामगिरी करायची किंवा कधी थांबायचे हे पक्के माहित आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगातील जवळपास सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना उद्या अर्थात 18 मार्च रोजी होणार होता. तोही आता पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता जवळपास 1 महिन्याच्या अंतरानेच क्रिकेटचे सामने प्रेक्षकांना पहायला मिळू शकतात.
ट्रे़डिंग बातम्या-
–टाॅप ५: मांजरेकरांसह इतिहासात हाकालपट्टी झालेले ५ समालोचक
–पृथ्वी शाॅ- श्रेयस अय्यर जोडीचा तुफान डान्स होतो व्हायरल, चाहते म्हणताय गो कोरोनावर धरलाय ठेका
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण