इटलीची प्रसिद्ध स्पोर्ट्स महिला टेलिव्हिजन सादरकर्ती (अँकर) डायलेट लिओटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरंतर या सुंदर निवेदिकेच्या घरात चोरी झाली आहे. इटलीच्या माध्यमांतील वृत्तांनुसार लिओटाच्या घरी तब्बल १.२७ कोटी रुपयांची चोरी झाली आहे. त्यामध्ये घड्याळे, रुपये आणि दागिन्यांचा समावेश आहे.
लिओटाचे (Diletta Leotta) घर मिलान (Milan) येथे आहे. जेव्हा तिच्या घरात चोरी झाली, तेव्हा ती एका स्थानिक हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. एका वृत्तानुसार, लिओटाच्या घरातून ८ घड्याळे, ज्यामध्ये रोलेक्सचाही समावेश आहे, दागिने आणि रुपयांंची चोरी झाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
लिओटा इटलीच्या फुटबॉल चाहत्यांंमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती नेहमी सिरी- एचे सामने कव्हर करण्यासाठी स्टेडियममध्ये जात असते. तसेच, एकदा स्टेडियममध्ये तिच्याबरोबर गैरवर्तणूक करण्यात आले होते.
मागील वर्षी लिओटा इटलीच्या सान पाऊलो स्टेडियममध्ये नापोली आणि ब्रेश्याचे (Napoli & Brescia) सामने कव्हर करण्यासाठी गेली होती. तिथे नेपोली संघाच्या चाहत्यांनी तिच्याबद्दल वाईट वक्तव्य केले. चाहत्यांनी तिला भर स्टेडियमध्येच टी-शर्ट काढण्याच्या घोषणा दिल्या होत्या.
नापोली संघाच्या चाहत्यांच्या या वाईट वक्तव्यावर लिओटाने अगदी सहजपणे प्रत्युत्तर दिले होते. तिने त्या संघाकडे पाहून स्मिथ हास्य करत आपला अंगठा खालच्या दिशेने केला होता.