---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप 2026साठी ‘हे’ दोन संघ सज्ज, इटली पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत!

On: शनिवार, जुलै 12, 2025 6:57 AM
---Advertisement---

आगामी 2026चा टी20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. भारत आणि श्रीलंका यजमान म्हणून आधीच पात्र ठरले आहेत. त्याच वेळी, उर्वरित संघ या मोठ्या स्पर्धेत खेळण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. आता इटली आणि नेदरलँड्सचे संघ 2026च्या टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे इटालियन संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेत प्रवेश केला आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ टॉप-2 मध्ये असेल. त्याला टी20 विश्वचषक 2026 साठी प्रवेश मिळाला आहे. नेदरलँड्सचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. त्यांनी एकूण चार सामने खेळले, त्यापैकी त्यांनी तीन जिंकले आणि एक गमावला. 6 गुणांसह त्यांचा नेट रन रेट 1.281 वर होता.

इटालियन संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांनी त्यांच्या चार सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत. तर त्यांनी फक्त एक सामना गमावला आहे आणि एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. 5 गुणांसह त्यांचा नेट रन रेट 0.612 होता. जर्सी संघाचेही पाच गुण होते. परंतु त्यांचा नेट रन रेट इटालियन संघापेक्षा कमी होता. यामुळे ते पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकले नाहीत आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. जर्सी संघाचा नेट रन रेट 0.306 वर होता.

स्कॉटलंडचे 2026च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. 2025च्या टी-20 विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेत ते चौथ्या क्रमांकावर राहिले. संघाची कामगिरी खूपच खराब होती. संघाने चार सामने खेळले, त्यापैकी संघाला फक्त एक जिंकता आला.

आतापर्यंत एकूण 15 संघ 2026 च्या टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा, नेदरलँड्स आणि इटली या संघांचा समावेश आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये अजूनही पाच जागा रिक्त आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---