---Advertisement---

असे ३ खेळाडू जे भारताविरुद्ध खेळण्याआधी कोणाला माहितही नव्हते, पण भारताविरुद्धच्या सामन्यानंतर त्यांचे नशीब पालटले

On: बुधवार, फेब्रुवारी 10, 2021 7:55 AM
---Advertisement---

इंग्लंड संघाने भारताविरुद्ध चेन्नईमध्ये पार पडलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात २२७ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या विजयात जो रूट आणि जेम्स अँडरसन यांच्या कामगिरीने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी त्यांच्यामध्ये आणखीन एक खेळाडू आहे ज्याने आपल्या कामगिरीमुळे इंग्लंडच्या पदरात विजय पाडला. तो खेळाडू म्हणजे ‘जॅक लीच’.

जॅक लीचने दुसऱ्या डावात रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांचे बळी घेत सर्वात महत्वपूर्ण कामगिरी केली, जी इंग्लंड संघासाठी अत्यंत महत्त्वाची होती. जॅक लीचने कसोटी सामन्यात एकूण ६ बळी घेतले. दुसऱ्या डावात ४ बळी घेऊन त्याने उत्तम कामगिरी बजावली.

जॅक लीच व्यतिरिक्त असे अनेक खेळाडू आहेत जे याअगोदर भारतीय संघावर भारी पडले आहेत. जॅक लीच प्रमाणेच पाकिस्तानी खेळाडू आकीब जावेद, वेस्ट इंडिजचा खेळाडू जिमी अँडम्स आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन यांचा देखील यात समावेश आहे. ज्यांची भारताविरुद्ध खेळण्याआधी फार मोठी ओळख नव्हती. पण ज्यावेळी भारताविरुद्ध खेळले तेव्हा त्यांचं नशीब पालटले.

जॅक लीच हे नाव क्रिकेट चाहत्यांसाठी हे फक्त इंग्लंड संघामध्ये खेळणारा एक खेळाडू इतकंच माहित होते, परंतु आता जो सामना त्याने खेळला त्यानंतर जॅक लीच चे नाव पुढे अनेकदा आठवणीने घेतले जाईल. जॅक लीचने १२ कसोटी सामने खेळले आहेत त्यात त्याने ४४ बळी घेतले आहेत.

या खेळाडूंचे देखील भारतीय दौऱ्यावर नशीब पालटले होते.

आकीब जावेद:

सन १९९९ मध्ये शारजाह येथे ज्यावेळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. त्यावेळी भारताविरुद्ध आकीब जावेद यांनी अविस्मरणीय कामगिरी केली होती. ज्यावेळी पाकिस्तानच्या इमरान खान, वसीम अक्रम आणि वकार युनूस यांसारख्या क्रिकेटपटूंचा बोलबाला होता तेव्हा याच खेळाडूने भारताविरुद्ध ७ बळी हस्तगत करत सर्वांना चकित केले होते. त्या खेळात आकीब जावेद याने १० षटकात ३७ धावा देत ७ गडी बाद केले होते. भारताविरुद्ध त्याने सर्वाधिक बळी घेतले आहेत.

मॅथ्यू हेडन

सन १९९७-९८ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी मॅथ्यू हेडनला जवळपास या मालिकेत घेण्याची शक्यता फार कमी दिसत होती, परंतु योगायोगाने त्याला संघात स्थान दिले गेले आणि याच दौऱ्याने त्याचे नशीब बदलले. त्या दौऱ्यात मॅथ्यू हेडन एक यशस्वी फलंदाज म्हणून उदयास आला. त्यानंतर काही दशकांसाठी तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग राहिले.

महत्त्वाच्या बातम्या –

…ज्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये ४५ मिनिटांत अवघ्या १५ धावांवर संपला होता एका संघाचा संपूर्ण डाव

अरेरे! घरच्या मैदानवरच आली वॉशिंग्टन सुंदरवर वाईट वेळ, विनोद कांबळीच्या नकोशा विक्रमाची केलीय बरोबरी

‘रिषभ पंत यष्टीरक्षणात आहे पाळण्यातील बाळ’, ‘या’ माजी क्रिकेटरने घेतला पंतचा खरपूस समाचार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---