---Advertisement---

‘रिषभ पंत यष्टीरक्षणात आहे पाळण्यातील बाळ’, ‘या’ माजी क्रिकेटरने घेतला पंतचा खरपूस समाचार

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 10:38 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे दिग्गज माजी यष्टिरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी यांनी भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला फलंदाज म्हणून ‘ प्रतिभाचे खजिना ‘ म्हणून संबोधित केले आहे. याचबरोबर यष्टिरक्षक म्हणून त्याची तुलना पाळण्यातील लहान मुलगा म्हणून केली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाला मालिका जिंकवून देणाऱ्या ऋषभ पंतच्या फलंदाजीचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे परंतु यष्टी मागच्या कामगिरीवर नेहमीच त्याच्यावर टीका केली जाते. किरमाणी यांनी म्हटलं आहे की,” ऋषभ पंत हा प्रतिभाचा खजिना आहे. तसेच तो मोठे फटके खेळणारा फलंदाज आहे. परंतु यष्टिरक्षक म्हणून त्याला भरपूर काही शिकायचे आहे. फलंदाजी करताना मोठा फटका केव्हा खेळावा, हे देखील त्याला शिकायचे आहे.”

तसेच ऋषभ पंतला यष्टिरक्षणासाठी सल्ला देताना किरमाणी म्हणाले, “त्याला यष्टिरक्षक म्हणून योग्य कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे, जी त्याच्याकडे नाहीत. एका यष्टिरक्षकाची क्षमता तेव्हाच कळून येते, जेव्हा तो यष्टीच्या बाजूला उभा राहतो. ऋषभ जगातील वेगवान गोलंदाजांसमोर यष्टिरक्षण करु शकतो. त्याच्याकडे भरपूर वेळ आहे.”

पंतला सांभाळून खेळण्याची गरज- किरमाणी
१९७६ पासून ते १९८६ पर्यंत भारतीय संघासाठी ८८ कसोटी सामने आणि ४९ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या किरमानी यांनी ऋषभ पंतला मोलाचा सल्ला देताना म्हटले, ‘ऋषभ पंत याला परिस्थिती अनुकूल फलंदाजी करण्याची गरज आहे. ऋषभ पंत शिकेल कारण तो युवा आहे. त्याने ब्रिसबेनमध्ये समजूतदारपणा दाखवत फलंदाजी केली होती. ज्यामुळे आपण पहिल्यांदाच विजय संपादन करण्यास यशस्वी झालो होतो. त्यानंतरही त्याने अनेक वेळा भारतीय संघाला विजय मिळवण्यापर्यंत नेले होते. परंतु शेवटच्या क्षणी त्याने आपली विकेट गमावली.”  इंग्लंड संघाविरुद्ध केलेल्या ९१ धावांबद्दल बोलतांना किरमानी म्हणाले, “ऋषभ पंतने चुकीच्या वेळी आपली विकेट गमावली.”

पंतने परिस्थिती नुसार खेळायला शिकायला हवं- किरमानी
“जेव्हा कुठला फलंदाज ८० धावांवर पोहोचतो तेव्हा त्याला शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी जोखीम न घेता सावध होऊन फलंदाजी करायला हवं. तेव्हा तुम्ही हे नाही बोलू शकत की, मोठे फटके खेळणे हा माझा नैसर्गिक खेळ आहे. त्यावेळी तुम्हाला परिस्थिती नुसार बदल करावे लागतात,” असेही ते पुढे म्हणाले.

रिषभ पंतची कसोटी कारकिर्दीतील कामगिरी
पंतने भारताकडून आजपर्यंत १७ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ७०च्या स्ट्राईक रेटने आणि ४४च्या सरासरीने ११९० धावा केल्या आहे. एवढ्या जबरदस्त स्ट्राईक रेटने फलंदाज सहसा कसोटीत धावा करत नाहीत. तसेच त्याने ६९ झेल व ३ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

वेड क्रिकेटचे! भारत-इंग्लंड कसोटीचे चक्क लग्न सोहळ्यात लाइव्ह-स्ट्रिमिंग, फोटो तूफान व्हायरल

सलग सात डावांत फ्लॉप ठरलेल्या रहाणेबद्दल कर्णधार कोहलीने दिली रोकठोक प्रतिक्रिया, रहाणे म्हणजे…

वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---