कसोटी, वनडे व टी२० क्रिकेटमध्ये मिळून जगात ५०९९ क्रिकेटपटू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्यात अनेकांनी धावांचे विक्रम आपल्या नावावर केले तर अनेकांनी गोलंदाजीत विकेट्सचे अनेक विक्रम आपल्या नावी केले.
परंतु जॅक कॅलिसने जो पराक्रम केला आहे तो जगात कुणालाही करता आलेला नाही. जॅक कॅलिस हा जगातील असा एकमेव खेळाडू आहे ज्याने कसोटी व वनडेत कमीत कमी १० हजार धावा, कमीत कमी २५० विकेट्स व कमीत कमी १०० झेल घेतले आहेत.
त्याने कसोटीत १६६ सामन्यात ५५.३७च्या सरासरीने १३२८९ धावा, ३२.६५च्या सरासरीने २९२ विकेट्स व २०० झेल घेतले आहेत. वनडेत त्याने ३२८ सामन्यात ४४.३६च्या सरासरीने ११५७९ धावा, ३१.७९च्या सरासरीने २७३ विकेट्स व १३१ झेल अशी कामगिरी केली आहे.
क्रिकेटच्या दोन्ही प्रकारात मिळून अशी कामगिरी कुणालाही करता आलेली नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
–वनडे पदार्पणाच्या सामन्यातच ५ मेडन ओव्हर टाकणारे ५ गोलंदाज
-सलमान खान की एमएस धोनी? केदार जाधवने दिलं हे उत्तर
-मी मुर्ख आहे का? ३०० वनडे सामने खेळून मला काही कळतं नाही का?
-आणि म्हणून शिखऱ धवनने पंजाबी गाणे ऐकणे केले बंद