सध्या सरेसाठी काउंटी क्रिकेट खेळत असलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू जेड डर्नबॅक लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. मात्र, या वेळी तो इंग्लिश संघाच्या वतीने नाहीतर, इटलीकडून खेळताना दिसेल. ३५ वर्षीय डर्नबॅकला पुढील महिन्यात होणाऱ्या २०२१ आयसीसी टी२० विश्वचषक युरोप पात्रता फेरीसाठी इटलीच्या संघात स्थान देण्यात आले आहे. डर्नबॅक २०११ ते २०१४ दरम्यान इंग्लंडकडून खेळला होता. मात्र, त्यानंतर त्याला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. डर्नबॅक नुकत्याच संपलेल्या द हंड्रेड लीगमध्ये लंडन स्पिरिट संघासाठी खेळताना दिसलेला.
अलिकडच्या काळात, डर्नबॅकला सरेसाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्याची जास्त संधी मिळाली नव्हती. या कारणास्तव, त्याने या हंगामानंतर सरे सोडण्याचा निर्णय घेतला. इटलीमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. डर्नबॅकची आई इटालियन असून, या कारणास्तव तो इटलीकडून खेळण्यासाठी पात्र ठरतो. एका प्रमुख क्रीडा संके स्थळाच्या माहितीनुसार, त्याला नॉर्थम्प्टनशायरचा खेळाडू गॅरेथ बर्गने इटलीकडून खेळण्यासाठी राजी केले. बर्ग हे इटलीचे कर्णधार आणि प्रशिक्षक आहेत.
अशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द
डर्नबॅचने इंग्लंडसाठी ३४ टी२० मध्ये ३९ बळी घेतलेले. त्याचबरोबर या गोलंदाजाच्या नावावर २४ वनडे सामन्यांमध्ये ३१ बळी जमा आहेत. त्याच्या खात्यात प्रथमश्रेणी क्रिकेटच्या ११३ सामन्यांमध्ये ३११, लिस्ट ए च्या १४४ सामन्यांमध्ये २२८ आणि १६५ टी२० सामन्यात १७८ बळी जमा आहेत. डर्नबॅचने २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २८ जून रोजी वनडे पदार्पण केलेले. याच्या तीन दिवस आधीच त्याने आपला पहिला टी२० सामना खेळलेला.
डर्नबॅकची २०११ च्या विश्वचषकात अजमल शहजादच्या जागी संघात निवड झाली होती. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. डर्नबॅकचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झालेला. मात्र, वयाच्या १४ व्या वर्षी तो इंग्लंडला स्थानिक झालेला. डर्नबॅक आपल्या संपूर्ण हातावर टॅटू काढल्याने चर्चेत आलेला.
महत्त्वाच्या बातम्या-
“पूर्वी फक्त भारत रडारवर होता, आता आणखी दोन संघ असतील”, पीसीबीच्या अध्यक्षांची धमकी
एमएस धोनीनंतर कोण होऊ शकतो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार? ‘हे’ चार नावं आहेत सर्वात पुढे
https://mahasports.in/pbks-vs-rr-live-punjab-kings-have-won-the-toss-and-have-opted-to-field/