---Advertisement---

Video: ‘सर’ जडेजाचा ‘कॉमिक अवतार’, पण नक्की कोणत्या फलंदाजाची केली नक्कल? चाहते संभ्रमात

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 10:56 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) शानदार सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पराभूत झाल्यानंतर सीएसकेने सलग तीन सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर नंतर (आरसीबी) ६ गुणांसह संघ गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

या हंगामात संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही प्रभावी दिसत आहेत. विशेषत: वरिष्ठ खेळाडू आपली जबाबदारी पार पाडत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध बुधवारी झालेल्या १८ धावांच्या विजयातही अनुभवी खेळाडूंचे योगदान होते.

त्याचवेळी, या सामन्यादरम्यान रवींद्र जडेजा कोणत्यातरी फलंदाजाची नक्कल करताना दिसला. त्याला अशी नक्कल करताना पाहून काही चाहत्यांनी त्याने कोलकाता विरुद्ध सामनावीर ठरलेल्या फाफ डू प्लेसिसच्या फलंदाजी शैलीची नक्कल केल्याचा कयास लावला आहे. तर काही चाहत्यांच्या मते जडेजाने दक्षिण आफ्रिकेचा महान कर्णधार ग्रॅमी स्मिथची नक्कल केली आहे.

जडेजाने डू प्लेसिसची नक्कल केल्याची दाट शक्यता
सीएसकेचा सलामीवीर फाफ डू प्लेसिसने केकेआरविरुद्ध नाबाद ६० चेंडूत ९५धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. त्याच्या खेळीमुळे सीएसकेने २० षटकांत २२० धावा केल्या आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. या खेळीनंतर सहकारी खेळाडूंनी फाफचे कौतुक केले. त्यामुळे डू प्लेसिसच्या या अफलातून खेळीमुळे जडेजाने त्याचीच नक्कल केली असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या व्हिडिओमध्ये जडेजा बॅटिंग स्टान्स देताना दिसतोय. ते पाहून संघ सहकारी पोट धरून हसत आहेत.

https://www.instagram.com/p/CN-QOzeBG3j/?igshid=h1f43leyfilb

सामनावीर ठरला होता फाफ
केकेआर विरुद्धच्या सामन्यात फाफ डू प्लेसिस सामनावीर ठरला होता. ऋतुराज गायकवाडसोबत त्याने पहिल्या गड्यासाठी ११५ धावांची सलामी दिली. त्यानंतर मोईन अलीसोबतही त्याने अर्धशतकी भागीदारी केली. प्लेसिसने अखेरपर्यंत नाबाद राहून ९५ धावा बनविल्या. फलंदाजांनी उभारलेल्या २२० धावांचा दीपक चाहर व लुंगी एन्गिडीने बचाव करत १८ धावांनी विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

रोहितने अखेर विराटला गाठलेच; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला चौथा फलंदाज

हिटमॅनने टाकले धोनीला मागे, आता ‘या’ विक्रमात फक्त विराट, गंभीर आणि वॉर्नर रोहितच्या पुढे

Video: निकोलस पूरनने घेतला डोळ्यांचे पारणे फेडणारा कृणाल पंड्याचा अप्रतिम झेल, एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---