बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात 14 डिसेंबर रोजी होईल. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या जागी जयदेव उनाडकट याला संघात घेतले गेले आहे. उनाडकट देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाचा महत्वाचा वेगावन गोलंदाज आहे. मात्र भारतासाठी मागच्या मोठ्या काळापासून त्याला खेळण्याची संधी मिळाली नाहीये. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज जयदेव उनाडकट याला संघात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडले गेले असले, तर दिनेश कार्तिक याच्या मते प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळेलच, याची खात्री देता येणार नाही.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील ही कसोटी मालिका दोन सामन्यांची आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवार (14 डिसेंबर) पासून चिटगावमध्ये खेळला जाणार आहे. मोहम्मद शमी (Mohammad Shami) भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याने अनेक मालिकांमध्ये मॅच विनरची भूमिका देखील पार पाडली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा सर्वांना होती. मात्र त्याला या दौऱ्यापूर्वी दुखापत झाल्यामुळे संघातून माघार घ्यावी लागली. अशात जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) त्याच्या जागी संघात सहभागी झाला. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मोठा असून त्याने उनाडकडला या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळेल, असे वाटत नसल्याचे सांगितले.
संघात उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर आधीपासून उपस्थित असल्यामुळे उनाडकटसाठी जागा दिसत नाही, असे कार्तिकला वाटते. माध्यमांशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, “खरं सांगायचं तर वाटले उनाडकटला शक्यतो या मालिकेत खेळण्याची संधी मिळणार नाही. संघात आधीपासूनच उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर उपस्थित आहेत. अशात त्यांना मालिकेत खेळण्याची संधी दिली जाईल, याची पूर्ण शक्यता नाही. पण ठीक आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शनाला दाद दिली गेली. त्याला संघाची जर्सी पुन्हा एकदा मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत देखील त्याला शक्यता संघात जागा बनवता येणार नाही. तोपर्यंत जसप्रीत बुमरा आणि शमी संघात पुनरागमन करतील.”
उनाडकटच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी आतापर्यंत फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. 16 डिसेंबर 2010 रोजी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा कसोटी सामना खेळला होता, ज्यामध्ये एकही विकेट न घेता 101 धावा खर्च केल्या. या सामन्यानंतर उनाडकटला अद्याप एकाही कसोटी सामन्यात भारतीय संघाने आजमावले नाहीये. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये 7, तर टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी 10 सामने खेळले आहेत. दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा नियमित कर्णधार दुखापतीमुळे खेळू शकरणार नाही. रोहितच्या जागी केएल राहुल (Rohit Sharma) संघाचे नेतृत्व करेल.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यु ईश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट. (‘Jaidev Unadkat will not play Test series against Bangladesh’, Dinesh Karthik’s big statement)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशियाई चॅम्पियन जपान भारताकडून पराभूत, सलग दुसऱ्या विजयासह अंतिम चारमध्ये मिळवले स्थान
पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूची अखिलाडूवृत्ती! थेट स्टोक्सशी ‘हँडशेक’ करण्यास दिला नकार