प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १६ तारखेला प्रो कबड्डीचा १२३ वा सामना तेलुगू टायटन्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. जयपूर संघाने ५४-३५ च्या मोठ्या अंतराने हा सामना जिंकला आहे.
Jaipur pink panthers register a big win over Telugu Titans.????????????#Kabaddi #ProKabaddiLeague #VIVOProKabaddi #PKL #PKL8 #Kabaddi pic.twitter.com/IABp0V108R
— Khel Kabaddi (@KhelNowKabaddi) February 16, 2022
तत्पूर्वी प्रो कबड्डीचा १२२ वा सामना बेंगाल वॉरियर्स विरुद्ध तमिळ थलाईव्हाज यांच्यात झाला. बेंगाल वॉरियर्सने ५२-२१ च्या फरकाने हा सामना जिंकला आहे.
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत २० सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १५ सामने जिंकत ८० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ६५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच यूपी योद्धा (६३ गुण), हरियाणा स्टिलर्स (६३ गुण), बेंगलुरू बुल्स (६१ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
इशांत शर्माचा ‘यू टर्न’! आयपीएलमध्ये नाही मिळाला खरेदीदार, आता ‘या’ रणजी संघाचे करणार प्रतिनिधित्त्व
विराट, राहुल टॉप-१० मध्ये कायम, तर गोलंदाजांमध्ये भुवनेश्वरने राखली लाज; पाहा ताजी टी२० क्रमवारी
प्रो कबड्डी: बेंगाल वॉरियर्सचा मोठा विजय, तमिळ थलाईव्हाजला ३१ गुणांच्या अंतराने दिली मात