जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केला. यजमान इंग्लंडला थरारक सामन्यात पराभूत करत त्यांनी मालिकेत आघाडी घेतली. या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंड संघावर टीका होताना दिसत आहे. त्याचवेळी इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने दुसऱ्या कसोटीपूर्वी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात जेम्स अँडरसन हा बळी मिळवण्यासाठी झगडताना दिसला. पहिल्या डावात एक तर दुसऱ्या डावात एकही बळी त्याला मिळवता आला नाही. त्यानंतर त्याने आता एका वृत्तपत्राशी बोलताना थेट मालिकेतील आगामी सामन्यांमध्ये न खेळण्याची धमकी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला दिली आहे.
तो म्हणाला,
“उर्वरित ऍशेस मालिकेत अशाच प्रकारच्या खेळपट्ट्या मिळणार असतील तर, या मालिकेत मी पुढे खेळताना दिसणार नाही. अशा खेळपट्ट्या माझ्यासाठी अतिशय खराब आहेत. इथे कोणत्याही प्रकारचा स्विंग, रिव्हर्स स्विंग, वेग आणि बाऊन्स मला दिसलेला नाही.”
त्याच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्याच्यावर तू केवळ वेगवान गोलंदाजीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवरच गोलंदाजी करू शकतो अशी टीका देखील केली आहे. अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त बळी घेणार आहे एकमेव वेगवान गोलंदाज आहे.
पहिल्या सामन्याचा विचार केल्यास, इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी 393 धावांवर आपला डाव घोषित केलेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तर देत ख्वाजाच्या शतकासह 386 पर्यंत मजल मारली. इंग्लंडला आपल्या दुसऱ्या डावात 273 धावा करता आल्या. विजयासाठी मिळालेले 281 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून पूर्ण केले.
(James Anderson Big Statement On Remaining Ashes 2023)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा! दिग्गज क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टीम इंडियात दिसतोय भविष्यातील भारतीय संघ! पुढील 5 वर्षाची तयारीच सुरू