जेम्स अँडरसन त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी सामना खेळत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लंडनमधील लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. अँडरसनच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा शेवटचा सामना आहे. आता त्याने शेवटच्या सामन्यात इतिहास रचून मोठा विक्रम केला आहे. अँडरसनने बनवलेला हा विक्रम त्याच्याआधी कोणत्याही वेगवान गोलंदाजाने साधला नाही.
वास्तविक, जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये 40,000 हून अधिक चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू असलेल्या कसोटीत त्याने 40,000 चेंडू टाकण्याचा टप्पा ओलांडला. वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर अँडरसननंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड हा वेगवान गोलंदाज आहे ज्याने कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकले आहेत. ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीत 33,698 चेंडू टाकले.
दुसरीकडे, जर आपण एकूण कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाबद्दल बोललो, तर श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन या यादीत अव्वल स्थानावर आहे. मुरलीधरनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 44,039 चेंडू टाकले. त्यानंतर या यादीत दुसरा क्रमांक भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेचा आहे. कुंबळेने आपल्या कसोटी कारकिर्दीत 40,850 चेंडू टाकले. या यादीत तिसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा आहे. वॉर्नने आपल्या कसोटी कारकिर्दीत 40,705 चेंडू टाकले. त्यानंतर जेम्स अँडरसन चौथ्या क्रमांकावर येतो.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीपूर्वी अँडरसनच्या नावावर 700 कसोटी विकेट्स होत्या. आता कसोटीचे दोन दिवस पूर्ण होईपर्यंत त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. हे वृत्त लिहिपर्यंत अँडरसनने 703 कसोटी बळी पूर्ण केले आहेत. अँडरसन त्याच्या कारकिर्दीतील 188 वा कसोटी सामना खेळत आहे. उल्लेखनीय आहे की, अँडरसन हा कसोटीत वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. तथापि, एकंदरीत पाहिल्यास, मुथय्या मुरलीधरन हा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे, ज्याच्या नावावर 800 बळी आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेची घोषणा, कर्णधाराने सोडलं नेतृत्व, संघाला मोठा धक्का
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ का नाही जाणार पाकिस्तानमध्ये? पाहा नेमकं कारण..
हे काय, कार्यकाळ सुरु होण्यापूर्वीच बिनसलं? बीसीसीआयने हेड कोच गंभीरच्या दोन्ही अटी फेटाळल्या