---Advertisement---

“जे पंतने केले ते गांगुलीनेही कधी केले नव्हते”, जेम्स अँडरसन झाला प्रभावित

On: मंगळवार, ऑगस्ट 3, 2021 6:32 PM
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारत या दौऱ्यामध्ये इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर होणार आहे. पहिल्या सामन्यातील इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने भारतीय युवा फलंदाजांचे कौतुक केले. तसेच, भारतीय युवा पिढीच्या यशाचे श्रेय इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) दिले.

हे गोलंदाजांसाठी वेगळे आव्हान असते
इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असलेल्या जेम्स अँडरसनने एका मुलाखतीत बोलताना भारताच्या युवा पिढीतील क्रिकेटपटूंचे कौतुक केले.

तो म्हणाला, “भारताची नवी पिढी निडर आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर आपण रिषभ पंतचे घेऊ शकतो. भारत दौऱ्यावर नवा चेंडू असताना त्याने माझ्याविरुद्ध रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलेला. असे कधी सौरव गांगुलीने देखील केले नाही. हे गोलंदाजांसाठी वेगळे आव्हान असते. हे खेळाडू कसोटीतही अशा प्रकारचे फटके खेळण्यास घाबरत नाहीत. ही आयपीएलने तयार केलेली पिढी आहे.”

पंतने लगावलेला अँडरसनविरूद्ध रिव्हर्स स्वीप
चालू वर्षी इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर आला असताना अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीत रिषभ पंतने अँडरसनविरुद्ध रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला होता. या मालिकेत रिषभने चार सामन्यात २७० धावा फटकावल्या होत्या. अखेरच्‍या कसोटीत त्याने शतकदेखील झळकावलेले‌. अशाच प्रकारचा एक फटका पंतने टी२० मालिकेत जोफ्रा आर्चरविरुद्ध देखील खेळला होता.

इंग्लंड बदला घेण्यास उत्सुक
इंग्लंड संघ यावर्षी भारतीय दौऱ्यावर आला असताना चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांना ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. विशेष म्हणजे मालिकेतील पहिला सामना इंग्लंड जिंकलेला. या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी इंग्लंडला पाच सामन्यांच्या आगामी मालिकेत मिळेल. २०१८ मधील मालिकेत इंग्लंडने भारतावर सरशी साधली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

पहिल्या प्रयत्नात १९.९९ चा थ्रो, नंतर सलग दोन फाऊल; तजिंदरपाल सिंग पडला ऑलिंपिकमधून बाहेर

इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात ‘असा’ असेल भारतीय वेगवान मारा, विश्वविजेत्या खेळाडूचे मत

सक्रिय भारतीय संघातील ‘या’ फलंदाजाने इंग्लंडला चांगलंच धुतलंय, बाहेरच नव्हे मायभूमीतही दिलाय चोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---