गॅले कसोटीत तब्बल सहा श्रीलंकन फलंदाजांना अंडरसनने धाडलं तंबूत, मिळवला मोठा किर्तीमान

James Anderson Takes 30th Five Wicket Haul Become First Aged Fast Bowler

श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंड संघ २ बाद ९८ धावांवर असून त्यांना अजून श्रीलंकाच्या २८३ धावांच्या आव्हानाचा डोंगर पार करायचा आहे. तत्पुर्वी श्रीलंका संघाच्या पहिल्या डावात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन याने अतुलनीय कामगिरी केली.

या डावात तब्बल ६ श्रीलंकन फलंदाजांच्या विकेट काढत अंडरसन आशिया खंडामध्ये फाइव्ह विकेट हॉल घेणारा सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापुर्वी कोणत्याही अनुभवी वेगवान गोलंदाजाला ही खास कामगिरी करता आली नाही.

जेम्स अंडरसन ठरला सहावा गोलंदाज 

गॅले कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकाचा सलामीवीर लहिरु थिरिमाने हा ३८ वर्षीय अंडरसनची पहिली शिकार ठरला. ४३ धावांवर त्याने थिरिमानेला झेलबाद केले. त्यानंतर कुशल परेरा आणि ओशादा फर्नान्डो हे स्वस्तात अंडरसनच्या हातून बाद झाले. त्यानंतर डावातील चौथी विकेट मिळवण्यासाठी अंडरसनला संघर्ष करावा लागला. अखेर शतकी खेळी केलेला एँजेलो मॅथ्यूज याच्या रुपात अंडरसनने संघाला महत्त्वपुर्ण विकेट मिळवून दिली.

तसेच श्रीलंकाचा यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला (९२ धावा) आणि सुरांगा लकमल (० धावा) यांना अंडरसनने पव्हेलियनला पाठवले. अशाप्रकारे अंडरसनने कसोटी कारकिर्दीत तब्बल ३० वेळा फाइव्ह विकेट हॉल घेण्याचा पराक्रम केला. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा फाइव्ह विकेट हॉल घेणाऱ्या दिग्गजांच्या यादीत त्याने सहावे स्थान पटकावले आहे. तसेच हा किर्तीमान मिळवणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

या विक्रमाच्या यादीत श्रीलंकन दिग्गज मुथय्या मुरलीधरन हा अव्वलस्थानी विराजमान आहे. त्याने सर्वाधिक ६७वेळा ही खास कामगिरी केली आहे. तर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न (३७ वेळा) आणि न्यूझीलंडचे दिग्गज रिचर्ड हाडली (३६ वेळा) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. याव्यतिरिक्त माजी भारतीय गोलंदाज अनिल कुबंळे चौथ्या आणि श्रीलंकन दिग्गज रंगाना हेराथ पाचव्या स्थानावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेने केले होते भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल

IND Vs AUS: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ‘या’ दिवशी टीम इंडिया होणार चेन्नईला रवाना

“इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सहज विजय मिळवेल”, ‘या’ माजी खेळाडूची भविष्यवाणी

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.