---Advertisement---

द्रविडचा ‘तो’ इमेल शेअर करत पीटरसनची भारत दौऱ्याआधी इंग्लंडच्या सलामीवीरांना मदत

On: रविवार, जानेवारी 24, 2021 9:14 AM
---Advertisement---

इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंकेत असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत इंग्लंडच्या डॉम सिब्ले आणि जॅक क्राऊले हे सलामीवीर खास मोठी कामगिरी करु शकले नाहीत. शनिवारी तर श्रीलंकेविरुद्ध खेळताना सिब्ले शुन्यावर आणि क्राऊले ४ धावांवर बाद झाला. त्यांना फिरकीपटू लसिथ एंम्बुलडेनियाने बाद केले. त्यानंतर त्यांना फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करताना पाहून खुद्द केवीन पीटरसन त्यांच्या मदतीसाठी धावून आला आहे. यासाठी त्याने त्याला राहुल द्रविडने पाठवलेल्या इमेलबद्दलही सांगितले आहे.

द्रविडची पीटरसनला मदत

इंग्लंडसाठी २००४ ते २०१४ दरम्यानच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत केवीन पीटरसन हा सर्वात आक्रमक फलंदाज होता. पण त्याच्याही कारकिर्दीत असा एक काळ होता, ज्यावेळी तो फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी संघर्ष करत होता, विशेषत: बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांसमोर. त्यामुळे पीटरसनने द्रविडकडे मदत मागितली होती. द्रविड आणि तो आयपीएलच्या सुरुवातीला एकत्र खेळायचे, त्यामुळे त्यांच्यात मैत्री होती.

पीटरसनने मदत मागितल्यानंतर द्रविडने त्याला एक इमेल लिहिला होता. ज्यात त्याने फिरकी गोलंदाजी साधारण कशाप्रकारे खेळायची याबद्दल सांगितले होते. ज्याचा पीटरसनला फार उपयोग झाला होता. त्यात द्विडने सांगितले होेते की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फेकल्या गेलेल्या चेंडूची लांबी पाहणे, फिरकीची वाट पाहून आणि आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. तसेच द्रविडने पीटरसनला कशा प्रकारे सराव कर, हे देखील इमेलमध्ये सांगितले होते.

पीटरसनने इंग्लंडच्या सलामीवीरांना देऊ केली मदत –

एकेकाळी मदत लागल्याने परिस्थिती माहित असलेल्या पीटरसनने इंग्लंडचे सिब्ले आणि क्राऊले यांना मदत देऊ केली आहे. त्याने ट्विट करत द्रविडने त्याला लिहिलेला इमेल शेअर केला आहे. त्याआधी पीटरसनने ट्विट केले होते की ‘क्राऊले आणि सिब्लेला द्रविडने मला पाठवलेला इमेल शोधण्याची गरज आहे, ज्यात फिरकी गोलंदाजी खेळण्याबद्दल सल्ला दिलेला आहे. त्यानंतर माझा खेळ बदलला होता.’

https://twitter.com/KP24/status/1352928401393283073

यानंतर पीटरसनने स्वत: द्रविडने लिहिलेल्या इमेलचे फोटो शेअर करताना म्हटले आहे की ‘इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याची प्रिंट काढून सिब्ले आणि क्राऊलेला द्यावी. त्यांना गरज वाटल्याच चर्चा करण्यासाठी ते मला संपर्क करु शकतात.’

https://twitter.com/KP24/status/1352932472930127872

त्याच्या या सल्ल्यावर इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने प्रतिक्रिया दिली असून त्याने म्हटले आहे की पीटरसनने त्याच्या गोलंदाजीवर द्रविडने सांगितल्याप्रमाणे पॅड न बांधता सराव केला होता. त्यावर पीटरसनने म्हटले की ‘आपण खूप सराव केला होता. त्याचमुळे आपण भारताला भारतात पराभूत करु शकलो होतो.’

https://twitter.com/KP24/status/1352935609158037504

 

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे इंग्लंडचा संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका संपल्यानंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतात त्यांना ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे या दौऱ्याआधी पीटरसनने फिरकी गोलंदाजी कशी खेळावी याबाबत इंग्लंडच्या फलंदाजांना मोठा सल्ला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेने केले होते भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल

IND Vs AUS: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ‘या’ दिवशी टीम इंडिया होणार चेन्नईला रवाना

…अन् नाईट वॉचमन म्हणून खेळलेल्या ‘त्याने’ शतकासह भारताला पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेत विजयी केलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---