वनडे विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वी सर्वत्र चर्चा सुरू आहेत. यावर्षीचा विश्वचषक विजेता संघ कोणता असेल, याविषयी चाहते आणि जाणकारांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच इंग्लंडचा दिग्गज कसोटी गोलंदाज जेम्स अँडरसन यानेही वनडे विश्चषकाच्या विजेत्य संघाविषयी अंदाज वर्तवला आहे. भारत आणि पाकिस्तान संघाविषयी अँडरसनने महत्वाची प्रतिक्रिया यावेळी दिली.
जेम्स अँडरसन (James Anderson) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज आहे. तसेच एकंदरीत विचार करता मुथय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो. त्याच्या नावावर आतापर्यंत 690 कसोटी विकेट्सची नोंद आहे. आगामी वनडे विश्वचषक गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरू होणार आहे. त्याआधी अँडरसन बीसीसी स्पोर्ट्सवर झालेल्या चर्चेत सहभागी झाला. यावेळी त्याने असं अंदाज वर्तवला की, भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचेल, पण त्यांना विश्वचषक जिंकता येणार नाहीत. तसेच पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत देखील पोहोचू शकणार नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि भारत हे चार संघ अँडरसनच्या मते उपांत्य फेरीत पोहोचतील.
अँडरसन म्हणाला, “इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि भारत हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. पाकिस्तान संघ जवळ पोहोचेल, पण उपांत्य फेरीच्या बाहेरच राहील. न्यूझीलंड संघासोबतही असेच होईल. इंग्लंड आणि भारत विश्वचषकाचा अंतिम सामना खेळेल आणि मला वाटते की इंग्लंड या संघर्षापूर्ण लढतीत भारताला मात देऊन जेतेपद मिळवेल.” विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध वनडे मालिका खेळल्या आणि या दोन्ही मालिकांमध्ये संघाला पराभव मिळाला. दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, त्यामुळे अँडरसन चांगलाच प्रभावित झाल्याचे दिसते. “नुकतेच वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रदर्शन केले, ते मला जबरदस्त वाटले. त्यांच्याकडे भक्कम फलंदाजी आहे आणि गोलंदाजीतही चांगले पर्याय आहेत,” असेही अँडरसन पुढे म्हणाला.
दरम्यान, इंग्लंडने 2019 साली पहिल्यांदा वनडे विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात त्यांना अगदी नाटकीय पद्धतीने न्यूझीलंडवर विजय मिळवता आला होता. अशात भारत आणि इंग्लंड संघ यावर्षी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने सामने आले, तर नक्कीच ही लढत रोमांचक ठरू शकते. (James Anderson’s Prediction about ODI World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
याला म्हणतात हाडाचा कर्णधार! लक्ष विचलित होतंय म्हणून रोहितच्या फोनमध्ये 9 महिन्यांपासून नाहीत ‘या’ 2 ऍप्स
भारती विद्यापीठ एमएसएलटीए डेक्कन जिमखाना अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत पावक हरीणकुमार, सनत कडले यांची आगेकूच